इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:16 PM2017-10-07T23:16:55+5:302017-10-07T23:16:58+5:30

ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या पहिल्या गुन्ह्यात इक्बाल कासकरने विकलेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी १० तोळे दागिने शनिवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे आणि मुंबईतील मालाड येथून जप्त केले.

Iqbal Kaskar seized jewelry, and the speed at the cost of operations | इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग

इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग

Next

ठाणे : ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या पहिल्या गुन्ह्यात इक्बाल कासकरने विकलेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी १० तोळे दागिने शनिवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे आणि मुंबईतील मालाड येथून जप्त केले. उर्वरित दागिनेही जप्त केले जातील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर, काही दिवसांत ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले. त्यातील पहिल्या गुन्ह्यातील ४० तोळे सोन्याचे दागिने ठाणे आणि मुंबईत विकल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानुसार, ते जप्त करण्यासाठी खंडणी पथक शनिवारी रवाना झाले.

मोक्कांतर्गत कारवाईला वेग
खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकर, छोटा शकील, इतर पाच जणांविरोधात संघटित गुन्हेगारी कायदा व कलमान्वये कारवाईस वेग आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव खंडणीविरोधी पथकाने पुढे पाठविला असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुन्हा पथक
उत्तर प्रदेशाला रवाना
खंडणीप्रकरणी फरार असलेल्या शमीन आणि गुड्डू या दोघांना अटक करण्यासाठी लवकरच खंडणीचे पथक उत्तर प्रदेश आणि बिहार येथे रवाना होणार आहे.

Web Title: Iqbal Kaskar seized jewelry, and the speed at the cost of operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा