टीव्ही लावण्याच्या कारणावरुन पतीने केला पत्नीवर लोखंडी सळईने प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:39 PM2019-07-15T22:39:32+5:302019-07-15T22:46:02+5:30

भल्या पहाटे टीव्ही पाहणा-या पतीला टीव्ही बंद करण्याचा सल्ला दिल्याने त्याला तो रुचला नाही. यातून संतप्त होऊन त्याने तिला शिवीगाळ केली. याला विरोध केल्याने पत्नीवर लोखंडी सळईनेच प्रहार करणा-या प्रमोद बॅनर्जी या पतीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Ironically, the husband attack on his wife: Due to TV | टीव्ही लावण्याच्या कारणावरुन पतीने केला पत्नीवर लोखंडी सळईने प्रहार

कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमुलाने केली मध्यस्थी केल्याने आईची झाली सुटकाशिवीगाळ करणाऱ्या पतीला रोखल्याने केला हल्ला

ठाणे: टीव्ही लावण्याच्या कारणावरुन पतीने पत्नीवर लोखंडी सळईने प्रहार केल्याची घटना कळवा परिसरात घडली. याप्रकरणी पती प्रमोद (४०) याच्याविरुद्ध त्याची पत्नी बसंती बॅनर्जी (३८, रा. कळवा) हिने कळवा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किरकोळ कारणावरुन पती नेहमीच भांडण करीत असल्यामुळे बसंती ही मुलासह दिवा येथे अलिकडेच वास्तव्याला गेली होती. परंतू, यापुढे भांडण करणार नाही, असा दावा करीत १० जुलै रोजी त्याने तिला पुन्हा कळवा येथील घरी आणले. १४ जुलै २०१९ रोजी पहाटे २.३० वा. च्या सुमारास तो टीव्ही पहात होता. तर प्रकृती ठीक नसल्याने ती झोपलेली होती. त्यामुळे तिने पतीला टीव्ही बंद करण्यास सांगितले. त्यावर संतापलेल्या तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने घरातील लोखंडी पाईपने तिच्या डोक्यात प्रहार केला. यात ती रक्तबंभाळ झाली असता, मुलगा कालीचरण याने तिची सुटका केली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिने या प्रकरणी पती प्रमोद बॅनर्जीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Ironically, the husband attack on his wife: Due to TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.