नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत काय? कपिल पाटील यांचा टोला
By नितीन पंडित | Published: October 2, 2023 04:40 PM2023-10-02T16:40:49+5:302023-10-02T16:41:02+5:30
देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्या पासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
भिवंडी : नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत का? त्यांना वास्तविकता काय माहिती, असे सांगत काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये जे चालतं ते भाजपामध्ये चालत नाही असा टोला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले भिवंडीत आले असता त्यांनी कपिल पाटील हे नावापुरते राज्यमंत्री असून सर्व कारभार प्रधानमंत्री कार्यालयातून चालतो, असा आरोप केला होता. त्यावर विचारले असता कपिल पाटील बोलत होते.
काँग्रेस काळात मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय राहुल गांधी फेडायचे ही काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपची तशी संस्कृती नाही, असे सांगत कपिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर अवघ्या तीन दिवसात मंत्री परिषदेच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्र्यांना काम वाटून द्या. त्यांच्या कार्यालय कडून फाईल्स आल्या पाहिजेत अशा सूचना कॅबिनेट मंत्री यांना दिल्या आहेत.
प्रधानमंत्री पीएमओमधून देशाचा कारभार चालवतात आणि देशाचा कारभार उत्तम चालववात म्हणून ते विश्वाचे नेते झाले आहेत. नाना पटोले यांना विसर पडला असेल ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्या पासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.