Thane: मोदींचा हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा, खासदार राजन विचारे यांचा सवाल
By अजित मांडके | Published: January 12, 2024 04:10 PM2024-01-12T16:10:19+5:302024-01-12T16:10:38+5:30
Thane: ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली.
- अजित मांडके
ठाणे - ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली. मात्र त्यांच्या मतदारसंघात सुरू होणाऱ्या लोकार्पण निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असा प्रश्न उपस्थित करत केंद्र व राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची विकृती असल्याची खोचट टीका उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला 2024 मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल.असे म्हटले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे - ऐरोली दरम्यान उभारलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो आहे. अशा ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केल्याचे ही विचारे यांनी म्हटले आहे. तसेच दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी सातत्याने पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असाच प्रश्न उपस्थित होत आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे.
कार्यक्रम पत्रकात विशेष उपस्थितांची नावे
कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत निमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपिल पाटील, उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्या नावांचा समावेश होता.