स्वच्छतेसाठी डोंबिवली, ठाण्यासह जिल्ह्यातील दहा रेल्वे स्थानकांना आयएसओ प्रमाणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 09:36 PM2021-08-18T21:36:50+5:302021-08-18T21:37:59+5:30
ही मान्यता विहित मानकांनुसार कार्यरत असलेल्या स्टेशनशी संबंधित आहे, जी चांगल्या सुविधा आणि स्वच्छता देण्याव्यतिरिक्त पर्यावरण टिकवण्यासाठी त्या पद्धतींचे पालन करतात. भारतीय रेल्वेचे ७२० इको-स्मार्ट स्टेशन आहेत.
डोंबिवली: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल -एनजीटी) द्वारे स्वच्छता या निकषावर निर्धारित केलेल्या अनिवार्य आवश्यकतांनुसार मध्य रेल्वेने सर्व इको स्मार्ट स्टेशनसाठी आयएसओ १४००१: २०१५ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्यात प्रामुख्याने डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, आंबिवली, कल्याण, ठाकुर्ली, कळवा, दिवा, मुंब्रा या स्थानकांचा समावेश आहे.
ही मान्यता विहित मानकांनुसार कार्यरत असलेल्या स्टेशनशी संबंधित आहे, जी चांगल्या सुविधा आणि स्वच्छता देण्याव्यतिरिक्त पर्यावरण टिकवण्यासाठी त्या पद्धतींचे पालन करतात. भारतीय रेल्वेचे ७२० इको-स्मार्ट स्टेशन आहेत. जे उपयोगकर्त्यांची संख्या आणि स्टेशन उत्पन्नावर आधारित आहेत. यांपैकी मध्य रेल्वेकडे सर्वाधिक ७७ इको-स्मार्ट स्थानके आहेत. मध्य रेल्वेअंतर्गत कार्यक्षेत्रातील सर्व ७७ इको-स्मार्ट स्थानकांसाठी आयएसओ १४००१: २०१५ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. भारतीय रेल्वेच्या कोणत्याही विभागापेक्षा सर्वाधिक ४६ इको-स्मार्ट स्थानके मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आहेत आणि या सर्व स्थानकांसाठी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आलेले आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाच्या ३७ इको-स्मार्ट स्थानकांसाठी नवीन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.
विभागीय पर्यावरण संघानेही समर्पित आणि निरंतर प्रयत्नांसह आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा जोडण्यासाठी एकही कसर सोडली नसल्याचे सांगत महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापकांनी आनंद व्यक्त करत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुककेले.