डोंबिवलीच्या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना घडणार इस्रोची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:29 AM2019-01-07T06:29:39+5:302019-01-07T06:30:07+5:30

सुभेदारवाडा विद्यालयाचे विद्यार्थी; १४० प्रकल्पांचे सादरीकरण

ISRO's journey to students of Dombivli's science exhibition will be | डोंबिवलीच्या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना घडणार इस्रोची सफर

डोंबिवलीच्या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना घडणार इस्रोची सफर

Next

जान्हवी मोर्ये

डोंबिवली : हायड्रोम पंप तयार केलेल्या कल्याणच्या सुभेदारवाडा विद्यालयाचे विद्यार्थी विज्ञान संमेलनात अव्वल ठरले आहेत. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रकल्पातील पहिल्या दहामध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोत जाण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानतर्फे संचालित यमगरवाडी येथील एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. इस्रोच्या सफरीचे दर्शन घडणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

डोंबिवतीलतील स. वा. जोशी विद्यालयात आयोजित या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उरण येथील १४० प्रकल्प मांडण्यात
आले होते. प्रकल्पातील नावीन्यता, कल्पकता, प्रत्यक्षात आणण्यासारखे किती प्रकल्प होते. त्यांच्यासाठी किती खर्च झाला, ते समाजोपयोगी आहेत का, गुगलवर सर्च करून प्रकल्प केला आहे का, या निकषांवर प्रकल्प निवडण्यात आल्याचे परीक्षकांकडून सांगण्यात आले. या प्रदर्शनात मांडलेले ११९ प्रकल्प गुगलच्या मदतीशिवाय बनवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुभेदारवाडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हायड्रोम पंपाचा प्रकल्प सादर केला होता. या पंपाच्या साहाय्याने विजेशिवाय नॉनरिटेनिंग व्हॉल्व्हचा वापर करून पाणी उंचावर नेता येते. पाण्याची दिशा बदलून दुसºया दिशेने पाणी एअर चेंबरमध्ये जाते. व्हॉल्व्हमुळे वर गेलेले पाणी खाली येते. त्याउलट, व्हॉल्व्ह लावलेल्या ठिकाणी एअर चेंबर्समध्ये हवा संकुचित होते आणि पाणी वर ढकलले जाते. या प्रकल्पाचा वापर नदीजोड प्रकल्पासाठी केला जाऊ शकतो. कोयना धरणाने धरणाचे समुद्राला मिळणारे पाणी अडवून पुन्हा नदीत सोडण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे थांबवली जाऊ शकते, असे प्रकल्पप्रमुख साक्षी रानडे आणि ऊर्जिता चौधरी यांनी सांगितले.

दुसरा क्रमांक ठाण्याच्या डॉ. बेडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. त्यांनी अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक हा प्रकल्प सादर
केला होता. तृतीय क्रमांक जीईआय ब्लॉसम इंटरनॅशनल विद्यालयाने मिळवलेला आहे. त्यांनी एनर्जी बार प्रकल्प सादर केला होता.
चौथ्या क्रमांकावर डोंबिवलीचे स्वामी विवेकानंद विद्यालय त्यांनी मॉस्क्युटिव्ह टॅप हा प्रकल्प सादर केला होता. पाचव्या क्रमांकावर एनईएस इंग्लिश स्कूल असून त्यांनी आयडियल गार्डन प्रकल्प सादर केला होता. या सर्व विद्यार्थ्यांना आता इस्रोला जाण्याची संधी मिळणार आहे.

‘एसआए’ला उत्तेजनार्थ
च्उत्तेजनार्थ पारितोषिक एसआयए हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजला दिले असून त्यांनी हायड्रोपोनिक्स प्रकल्प सादर केला होता. ओमकार सीबीएसई स्कूलने सेफ अ‍ॅण्ड सेक्युअर सिटी हा प्रकल्प सादर केला होता. ओमकार आयसीएसई स्कूलने रोबोटिक फार्मिंग प्रकल्प सादर केला होता. एकलव्य प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलने नायट्रोजनाइज्ड सनकॅचर हा प्रकल्प सादर केला होता.

Web Title: ISRO's journey to students of Dombivli's science exhibition will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.