पालिकेच्या प्रत्यक्ष महासभेचा मुद्दा थेट शरद पवारांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:29+5:302021-06-09T04:49:29+5:30

ठाणे : वेळेवरच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेची सभा होत आहे. याबाबत संबधितांशी चर्चा करून प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्न ...

The issue of the actual general meeting of the corporation is directly in the court of Sharad Pawar | पालिकेच्या प्रत्यक्ष महासभेचा मुद्दा थेट शरद पवारांच्या दरबारात

पालिकेच्या प्रत्यक्ष महासभेचा मुद्दा थेट शरद पवारांच्या दरबारात

Next

ठाणे : वेळेवरच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेची सभा होत आहे. याबाबत संबधितांशी चर्चा करून प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेवक हणमंत जगदाळे यांना दिले. ठाणे महानगरपालिकेत प्रत्यक्ष महासभा होत नसल्याने अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा पाडला जात असल्याचा आरोप करत, या भेटीत त्यांनी महापालिकेतील कारभाराबाबत अनेक मुद्दे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

सभागृहाच्या कामकाजात बहुमताच्या जोरावर नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. अनेक महत्त्वाचे विषय टाळले जात आहेत. जनतेच्या हितापेक्षा स्वहिताच्या विषयांवर अधिक भाष्य करण्यात येत आहे. किंबहुना असेच ठराव मंजूर करण्यात येत आहेत. कोविडच्या काळात ऑनलाईन सभा घेतली जात असली, तरी त्यामध्ये अनेक नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. त्यांचे आवाज म्युट करून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकांची मुस्कटदाबी केली जात आहे. अनेकदा वेळवरच्या विषयांच्या नावाखाली अनावश्यक विषयांना मंजुरी देण्यात येत असते. त्याचा गोषवाराही नगरसेवकांपर्यंत पोहोचलेला नसतो. अर्थसंकल्प वेळेत मंजूर केला जात नसल्यामुळे प्रभागाच्या विकासकामांमध्ये बाधा येत आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्यांचा निपटारा करता येत नाही. चुकीचे ठराव पारित केले जात आहेत. या ठरावांची अंमलबजावणी प्रशासनाकडून होऊ नये, अशा मागण्या पठाण आणि जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावर शरद पवार यांनी सभागृह सर्व सदस्यांना खुले करून थेट महासभा घेण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष महासभा घेण्यासंदर्भात आपण संबधितांशी चर्चा करणार आहोत. ठाणे पालिकेतील अनागोंदीसंदर्भातही आपण संबधितांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, प्रत्यक्ष महासभा घेण्यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे अन् गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेणार आहोत, असे शानू पठाण यांनी सांगितले.

Web Title: The issue of the actual general meeting of the corporation is directly in the court of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.