स्टेडिअमचा मुद्दा राष्ट्रवादीवरच बुमरँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:52 AM2018-02-21T00:52:00+5:302018-02-21T00:52:00+5:30
मुंब्य्रातील स्टेडीअम उभारून तीन वर्षे झाली तरीदेखील आजही ते सुरु केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी तेथील स्थानिक नगरसेवकांनी महासभेत हगांमा केला.
ठाणे : मुंब्य्रातील स्टेडीअम उभारून तीन वर्षे झाली तरीदेखील आजही ते सुरु केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी तेथील स्थानिक नगरसेवकांनी महासभेत हगांमा केला. येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसल्याचे सांगून स्टेडीअम सुरू करण्याकामी भाजपा आमदाराने आडकाठी केल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपाचे नगरसेवकही आक्रमक झाले. मात्र, राष्टÑवादीच्या मदतीला शिवसेना धावल्याने भाजपाचे नगरसेवक एकाकी पडल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. अखेर ज्या आमदाराने हे पत्र पालिकेला दिले होते. त्या पत्राचे वाचन झाल्यानंतर स्टेडीअमचा उल्लेख कुठेच नसल्याचे स्पष्ट झाल्याने या नगरसेवकांवरच आरोपाचा मुद्दा बुमरँग झाला.
महासभा सुरू होताच, मुंब्य्रातील नगरसेवकांनी हाती बॅनर घेऊन तेथील स्टेडीअम सुरू करण्यासाठी आंदोलन केले. परंतु, सभागृहात अशा पद्धतीने निषेध करणे चुकीचे असल्याचे सांगून बाजू मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार या स्टेडीअमसाठी ४० कोटी खर्च करूनही ते तीन वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे येथील मुलांनी खेळण्यासाठी जावे कुठे असा सवाल राष्टÑवादीचे नगरसेवक राजण किणी यांनी केला. तर भाजपा आमदारांच्या पत्रामुळेच ते आजही खुले होऊ शकले नसल्याचा आरोप नगरसेवक शानु पठाण, सिराज डोंगरे आदींसह राष्टÑवादीच्या इतर नगरसेवकांनी केला. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले. भाजपा आणि राष्टÑवादीचे नगरसेवक आक्रमक झाले असतांनाच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या संधीचा फायदा घेऊन गुगली टाकून केलेल्या आरोपात तथ्य असेल तर, त्या आमदाराचे नाव जाहीर करावे अशी मागणी केली. त्यानंतर संजय केळकर यांच्यामुळेच हे काम थांबल्याचा आरोप केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. त्या पत्राचे वाचन व्हावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी केली. परंतु, ते होईपर्यंत राष्टÑवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक हे भाजपावर तुटून पडल्याचे दिसून आले.
दरम्यान या पत्राचे वाचन झाले आणि त्यात निविदा न काढता शहरातील स्टेडि0अमची कामे कोणालाही देता येऊ नये, निविदा काढून पारदर्शक कामे केली जावीत, अशी मागणी केळकर यांनी पत्रात केली होती. परंतु, यामध्ये मुंब्य्रातील स्टेडीअमचा उल्लेख कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे भाजपाने पुन्हा राष्टÑवादी नगरसेवकांना टार्गेट केले.