लोकमतने रक्ताचे नाते जपले हे कौतुकास्पद: रवी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:48 AM2021-07-05T00:48:00+5:302021-07-05T01:00:10+5:30
दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवाशी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा निर्माते रवी जाधव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवाशी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा निर्माते रवी जाधव यांनी केले. रविवारी सकाळी हिरानंदानी मेडोज याठिकाणी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मनोगत व्यक्त करतांना ते बोलत बोलत होते. यावेळी ४६ दात्यांनी रक्तदान केले.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस येथे हिरानंदानी मेडोज फेडरेशन, ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे आणि इंडियन रेड क्र ॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत रक्ताचं नात या उपक्र मांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक जाधव पुढे म्हणाले, लोकमतने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल खूप आनंद होत आहे. सध्या कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात राज्यभर रक्ताचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे अशा रक्तदान शिबिराची काळाची गरज आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी लोकमतने रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. महाराष्टÑभर जवळपास ५०० ठिकाणी अशा ठिकाणी रक्तदान शिबिराचे लोकमतने आयोजन केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराला आणखी प्रतिसाद मिळेल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी ठाण्याचे भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, हिरानंदानी मेडोज फेडरेशनचे अध्यक्ष जयदीप ठक्कर, भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, ठाणे जिल्हा भाजप युवक अध्यक्ष सारंग मेढेकर आणि लोकमतचे उपाध्यक्ष अनिरु द्ध हजारे आदी उपस्थित होते.
रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान या महारक्तदान शिबिर सोशल डिस्टनिसंगच्या नियमांचे पालन करुन तसेच शासनाने दिलेल्या सर्व नियमानुसार करण्यात आले. शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि नगरसेविका स्रेहा आंब्रे यांच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरासाठी राजेश सावंत, समीर पॉल, समीर माने, रतन पवार, शुभम त्रिपाठी, पुष्कर लखे, सहील कदम, सागर पवार, अनुष्का शिंदे, सानिका गोडबोले, निमित ललन आणि नीरज मालवी आदींचे सहकार्य लाभले.
या दात्यांनी केले रक्तदान...
या शिबिरामध्ये लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे, नितीन खरे आणि सौरभ वैद्य यांच्यासह हिरानंदानी मेडोज सोसायटीतील अर्चना संद, जितेंद्र पाटील, पियुश गुदलिशा, गुलाब चव्हाण, देवाशिष शहा, धवल मारु, हार्दिक सुमारिया, निलेश विरपंजा, सचिन कांबळे, सुरेश सोळंखे, मिरज सावला, अजय मिर्झा, प्रदीप पाल, प्रदीप पांडे, सुनिल चंद्रन, अमोल जोशी, रोमित नागडा, चिराग बोहरा, सलीम शेख, अनिरुद्ध चव्हाण, रमेश गुप्ता, नितीन बनसोडे, मनिष खालंकारे, अशोक नादमोरी, राकेश खमके, राकेश बोºहाडे, रोहित बोºहाडे, अभिषेक गोरे, अक्षय पापडे, सपना विश्वकर्मा आणि जया अय्यर आदी ४६ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.