उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात, भिंत पडली, कारवाई नाही

By सदानंद नाईक | Published: November 13, 2022 05:53 PM2022-11-13T17:53:12+5:302022-11-13T17:53:40+5:30

उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात असल्याचे समोर आले आहे. 

 It has come to light that the existence of the park in Ulhasnagar Venus Chowk is in danger | उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात, भिंत पडली, कारवाई नाही

उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात, भिंत पडली, कारवाई नाही

Next

उल्हासनगर (ठाणे) : कॅम्प नं-४ व्हीनस चौकातील मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने सन-२०१८ मध्ये १५ लाख खर्चून उभारलेल्या उद्यानाचे अस्तित्व धोक्यात आले. शेजारील सुरू असलेल्या इमारत पुनर्बांधणी वेळी उद्यानाची भिंत पडूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगर महापालिका व्हीनस चौक मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रते बसत होते. या भाजी विक्रेतेमुळे वाहतूक कोंडी होती. असा शोध लावून महापालिकेने ४० वर्ष जुन्या भाजी विक्रेत्यांना हुसकावून देत रस्त्याच्या बाजूला १५ लाख रुपये खर्चातून साई वशानशहा यांच्या नावाने उद्यान बांधले. यावेळी माहितीच्या नावाखाली मागितलेल्या माहितेत महापालिकेने रस्त्यावर उद्यान बांधल्याची कबुली दिली होती. उद्यान बांधले तेंव्हा पासून बंद असून उद्यानाची दुरावस्था झाली. दरम्यान शेजारील सोसायटीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाल्यावर, उद्यानाची भिंत पडली. महापालिका संपत्तीचे नुकसान झाल्याची ओरड महापालिकेने करून कारवाई करायला हवी होती. मात्र उद्यानाची भिंत पडूनही बघ्याच्या भूमिकेत असल्याने, महापालिका कारभारावर टीका होत आहे.

व्हीनस चौकात मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेले उद्यान सार्वजनिक रस्त्यावर बांधल्याची माहिती, माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेने सन-२०१८ साली दिली होती. मात्र बांधलेल्या उद्यानाची जागा ही शेजारील सोसायटीच्या जागेत येते. असी माहिती महापालिका नगररचनाकार विभागाकडून देण्यात येत असल्याने, विभाग पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विभाग वादात सापडला असून मृत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना देणे, विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल शेजारील आरक्षित भूखंडावर बांधकाम परवाना दिल्यावर, जागेवर दुसऱ्याने हक्क सांगणे, आतातर जागेची सनदच्या चौकशीची मागणी प्रांत कार्यालय व नगररचनाकार विभागाने शासनाकडे केली. तसेच रिस्कबेस बांधकाम परवानगीच्या नावाखाली बहुमजली बांधकाम झाल्याच्या तक्रारी आहेत. मात्र कारवाई नाही. असा अनेक वादात नगररचनाकार विभाग सापडले आहे. 

रस्त्यावर उद्यान बांधलेच कसे? 
महापालिकेने रस्त्यावर १५ लाख खर्च करून उद्यान बांधलेच कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक नरेश तहेलरामानी यांनी महापालिकेकडे केली. सोसायटीच्या जागेत उद्यान बांधल्याचे, आताच कसे बोलले जात आहे. आदीमुळे उद्यानाचे अस्तित्व धोक्यात असून १५ लाख पाण्यात गेले. या प्रकरणी सबंधीतावर कारवाईची मागणी व उद्यानाची भिंत पडल्या प्रकरणी कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.  

 

Web Title:  It has come to light that the existence of the park in Ulhasnagar Venus Chowk is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.