चौकशी सुरु असलेल्या ठेकेदाराबरोबर आयुक्तांनी चर्चा करणे अयोग्य - भाजपाने उपस्थित केला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:48 PM2018-10-11T15:48:05+5:302018-10-11T15:51:21+5:30
राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेवर थीम पार्कच्या मुद्यावरुन आगपाखड केली असतांना आता भाजपाने सुध्दा यात उडी घेतली आहे. शिवसेनेबरोबरच प्रशासनावरसुध्दा भाजपाने टिकेची झोड उठवित, या चौकशीबाबतच आक्षेप घेतला आहे.
ठाणे - ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्कच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेवर आसुड ओढले असतांनाच आता भाजपाने सुध्दा शिवसेनेसह प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे. ज्या ठेकेदाराची चौकशी सुरु झाली आहे, जो प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात आहे, महासभेत ज्या विषयावर वादळी चर्चा झाली आणि आयुक्तांनीसुध्दा या प्रकरणाच्या चौकशीला हिरवा कंदील दिला असतांना त्याच आयुक्तांनी संबधीत ठेकेदाराबरोबर चर्चा करणे चुकीचे असल्याचे मत भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केले आहे.
महासभेत ४८ तासात ठराव करून चौकशी सुरु करायची हे ठरले असतांना सुद्धा सत्ताधारी शिवसेनेने ठरावच वेळेत केला नाही. त्याच वेळी या भ्रष्टाचारात सत्ताधारी शिवसेना कोठेतरी जोडली असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त झाला. चौकशी समितीत सर्वपक्षीय नगरसेवक हवे असे देखील ठरले प्रत्यक्षात मात्र समितीत कोण आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तसेच समितीचे कामकाज सुरु होईल की नाही हे मोठे प्रश्नचिन्ह असल्याचे मत पाटणकरांनी व्यक्त केले आहे. अशा पाशर््वभूमीवर सल्लागार व ठेकेदार नितीन देसाई यांना, ज्या अधिकाºयावर आरोप आहेत त्या मोहन कलाल यांच्या बरोबरच आयुक्तांनी भेटणे हे मूळात प्रशासकीय आदबीला धरून नाही. चौकशी समितीने चौकशी दरम्यान ठेकेदारास सुनावणी देणे अपेक्षित आहे असे पायंडे असतांना एवढ्या मोठ्या आयएएस अधिकाºयाकडून अशी चूक होणे अपेक्षित नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे, प्रत्येक वर्षी स्वर्गीय आनंद दिघे नवरात्रीचे डेकोरेशन पुण्याच्या दगडू हलवाई गणपतीच्या धर्तीवर किंवा अगदी तसेच करायचे. ही त्यांची प्रथा आताच्या शिवसेनेने मोडली आहे. ज्या ठेकेदाराची चौकशी खुद्द शिवसेनेच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते नरेश म्हस्के, सभापती राम रेपाळे समितीत बसून करणार आहेत त्या ठेकेदाराला पालकमंत्र्यांनी भेटायचे हे कितपत योग्य असेही मतही त्यांनी व्यक्त केले. नितीन देसाई हे एकटेच असे सेट उभारणारे नाहीत. त्यामुळे थीम पार्क व बॉलिवूड पार्क दोन्ही कामाच्या भ्रष्टाचारात शिवसेनेच्या दबावाखालीच आयुक्तांनी निर्णय घेतले का हे त्यांनी ठाणेकरांना सांगणे जरु रीचे आहे. प्रशासनाचा कारभार पारदर्शी आहे असे प्रमुखांनी सांगणे आणि प्रत्यक्ष तसा विश्वास ठाणेकरांच्या मनात निर्माण करणे हे आता पालकमंत्री आणि प्रशासन यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.