वीज बिल बाकी सांगून फसवणाऱ्या डिजिटल लुटारूंना पकडणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:56 PM2022-07-27T20:56:35+5:302022-07-27T20:56:48+5:30

वीज बिल भरले नाही सांगून वीज पुरवठा तोडण्याची धमकी देणारे खोटे संदेश पाठवून नागरिकांना फसवणाऱ्या डिजिटल लुटारूंना पकडणे विविध कारणांनी अवघड होत आहे.

It is difficult to catch the digital robbers who cheat by telling the electricity bill balance | वीज बिल बाकी सांगून फसवणाऱ्या डिजिटल लुटारूंना पकडणे अवघड

वीज बिल बाकी सांगून फसवणाऱ्या डिजिटल लुटारूंना पकडणे अवघड

Next

मीरारोड - 

वीज बिल भरले नाही सांगून वीज पुरवठा तोडण्याची धमकी देणारे खोटे संदेश पाठवून नागरिकांना फसवणाऱ्या डिजिटल लुटारूंना पकडणे विविध कारणांनी अवघड होत आहे. त्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे हा तूर्तास प्रभावी उपाय ह्या डिजिटल फसवणुकीवर असल्याचे दिसत आहे. 

वीज बिल भरले नसल्याने वीज तोडणार असे संदेश पाठवून भाईंदर पूर्वेच्या नवघर भागातील प्रतिभा मिश्रा ह्यांना ९० हजारांना तर पश्चिमेला राहणाऱ्या विमल दोषी ह्यांना तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांना डिजिटल लुटारूंनी फसवल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.   

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, वीज बिल थकबाकीची संदेश कोणतीही कंपनी १० आकडी मोबाईल वरून पाठवत नाही तसेच कोणत्याही १० आकडी क्रमांकावर कॉल करा असे सांगत नाही. मुळात अश्या घटना घडू लागल्या नंतर पोलीस व वीज कंपन्या सातत्याने लोकांना संदेश पाठवून तसेच वृत्तपत्र, समाज माध्यमातून जनजागृती करत आहे. तरी देखील अनेक लोक ह्या खोट्या संदेश ना बळी पडून फसत आहेत.

मुळात असे खोटे संदेश पाठवणारे जे लुटारू आहेत ते पैसे भरण्यासाठी जी लिंक पाठवतात ती एनिडेस्क वा क्विक सपोर्ट ह्या आपल्या मोबाईल, संगणकची रिमोटली एक्सेस देणारी सॉफ्टवेअर आहेत. त्यामुळे त्या लिंक द्वारे आपण आपल्या मोबाईल वा संगणकाचा एक्सेसच समोरच्याला देऊन टाकतो. शिवाय बँक खात्याची माहिती भरतो जेणे करून  समोरची व्यक्ती काही मिनिटातच आपल्या खात्यातील रक्कम लंपास करून टाकते.  

ज्या मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठवले जातात, कॉल केले जातात ते क्रमांक लुटारूंना सहज मिळतात. विशेषतः झारखंड, ओडिसा, छत्तीसगढ, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यात ठोस पुरावे व पडताळणी न करताच सहज मोबाईल सिमकार्ड मिळते. कॉल करणारे हे आजूबाजूच्या राज्यातले मोबाईल नंबर घेऊन दुसऱ्याच राज्यातून त्याचा वापर करतात. त्यामुळे मोबाईल क्रमांका वरून भामट्यांचा शोध घेणे अवघर जाते. लोकेशन सुद्धा दुर्गम भागातील असते. 

लोकांचे फसवून काढलेले पैसे हे आधी पेमेंट वॉलेट वा गेम एप वर घेतात आणि मग बँक खात्यात फिरवून एटीएम ने काढून घेतात. हल्ली काही बँका ह्या बँक खाते मोबाईल वरूनच ऑनलाईन ओटीपी द्वारे उघडली जात असल्याने पुरेसे पुरावे - पडताळणी सारखे प्रकार सहज चुकवता येतात. डिजिटल लुटारुंच्या टोळ्या मुख्यत्वे झारखंड मधून सक्रिय आहेत. अन्य काही राज्यातून सुद्धा अश्या टोळ्या कार्यरत आहेत. बँक खात्यांची माहिती लवकर मिळत नाही. बँक खाती सुद्धा बोगस वा दुसऱ्यांच्या नावाने असतात.  अपूर्ण वा दिशाभूल करणारा पत्ता, नाव असलेल्या आधार कार्डचा वापर जास्त केला जातो. आरोपींचा सुगावा लागणे एकूणच किचकट व अवघड असतेच पण अश्या लुटारूला पकड्ण्यास जायचे म्हटले तरी त्या राज्यातील स्थानिक पोलिसांकडून महाराष्ट्रातून आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसाना फारसे सहकार्य मिळत नाही. एखाद्या गावातील बहुसंख्य लोक ह्याच फसवणुकीच्या धंद्यात असतात व त्याच पैश्यांवर अवलंबून असल्याने लोकां कडून सुद्धा फारशी माहिती मिळत नाही. जेणे करून काही पोलिसांचा फारसा उत्साह अश्या गुन्ह्यातील आरोपीना पकडून आणण्यात दिसत नाही. 

वीज बिल भरले नाही सांगून होणाऱ्या फसवणुकी पासून सावध रहा 
वीज बिल भरले नसल्याने वीज कापणार असे संदेश पाठवून लोकांना फसवणाऱ्या पासून सावध रहा व त्यांनी पाठवलेली लिंक क्लिक करू नका, त्यांना ओटीपी व बँक खाते माहिती शेअर करू नका असे आवाहन मुंबई उपनगर मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या अदाणी इलेक्ट्रिकसीटी ने केले आहे. 

वीज कंपनीकडून पेमेंटलिंक कधीही पाठवली जात नाही तसेच ग्राहकांकडून ओटीपी, बँक खात्याचा तपशील मागितला जात नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी विविध पेमेंट पद्धती आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. कंपनीचे मोबाइल एप हे विजेचे बिल भरण्यापासून ते आधी भरलेल्या बिलाचा तपशील देते. ग्राहक त्यांची बिले मिळणे, देयक तपासणे आदी विविध सेवांबाबत व्हॉट्स एप वर संपर्क साधू शकतात. त्यामुळे वीज बिल बाकी असल्याचे संदेश पाठवणारे व संपर्क करणाऱ्या फसव्या लोकांना प्रतिसाद देऊ नये व सावध राहून कंपनीच्या अधिकृत व सुरक्षित पेमेंट गेटवे द्वारे वीज देयक भरावे असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: It is difficult to catch the digital robbers who cheat by telling the electricity bill balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.