वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 14, 2024 06:05 PM2024-07-14T18:05:45+5:302024-07-14T18:05:56+5:30

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

It is important to do justice to the weight of the sentence Vaibhav Joshi | वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपण गद्य सुद्धा नीट बोलत नाही त्यामुळे पद्य सादरीकरणामध्ये आपल्याला अडचण येते. आपण सादरीकरण कराताना आपल्या उच्चाराकडे लक्ष नसेल तर ऐकणारा श्रोता देखील आपल्या संभाषणाकडे लक्ष देत नाही. वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

रविवारी गडकरी रंगायतन येथे टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य पे चर्चा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. हल्ली काय लिहीले यापेक्षा कोणी लिहीले याला जास्त दाद दिली जाते. नविन लिहिलेल लोकांना ऐकवायला पाहिजे हे सांगताना जोशी यांनी पुढच्या वर्षी वारी ही कविता सादर करुन चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पहिली कविता कशी सुचली याचा प्रवास उलगडताना जोशी म्हणाले की, छोट्या छोट्या गावांतून ज्यावेळी मुले शहरात येतात त्यावेळी मराठी भाषेचेच वर्गीकरण केले जाते त्यामुळे त्यांना संभाषणाची आणि अभिव्यक्तीची भिती वाटू लागते. त्यामुळे ही मुले कोमेजून जातात. असाच सामाजिक परिस्थीतीमुळे दबले गेल्यामुळे मी सेंटर स्पेस घेण्याचा प्रयत्न करत होतो. कविता सुचते कशी? या माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, कविता सुचते कशी याला खरंतर उत्तर नसते. कविता स्वयंभू येते. शून्यातून उगवणारी गोष्ट असते. जादूगार आणि कवीत एकच फरक असतो. जादूगाराला जादू करताना त्यातून काय बाहेर येणार आहे हे माहित असते पण कवीला कोणती कविता सुचेल हे माहीत नसते. जादूगाराची जादू बाहेर येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव असतात पण जेव्हा कवीकडून कविता तयार होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकांसारखेच भाव असतात. या जगात अखंड काव्य आहे, लिहीणारा वर बसलेला परमेश्वर आहे. त्याला लिहायचे होते म्हणून तो वेगवेगळ्या देहातून लिहीतोय असे उद्गार त्यांनी काढले.

Web Title: It is important to do justice to the weight of the sentence Vaibhav Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे