कुणाचेही कॉल डिटेल्स काढणे मांगलेला शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:28 AM2017-11-21T04:28:56+5:302017-11-21T04:29:10+5:30
ठाणे : कुणाच्याही मोबाइल फोनमधून केलेल्या कॉल्सचा तपशील काढणे हे सतीश मांगलेसाठी सहज शक्य असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
राजू ओढे
ठाणे : कुणाच्याही मोबाइल फोनमधून केलेल्या कॉल्सचा तपशील काढणे हे सतीश मांगलेसाठी सहज शक्य असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. असा तपशील हा स्वत: त्या व्यक्तीला किंवा तपासासाठी केवळ पोलीस यंत्रणेला मिळू शकतो. पण, यामध्ये मांगले पारंगत असल्याचे दिसते.
खंडणीच्या उद्योगात मांगले अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना ४ हजार
कॉल्स रेकॉर्ड्स मिळाले. त्यापैकी काही रेकॉर्ड्स पोलिसांनी ऐकले. बहुतांश रेकॉडर््स मोपलवार यांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. अद्याप बºयाच रेकॉर्ड्सची पडताळणी होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खंडणीकरिता सावज हेरण्यासाठी संबंधिताच्या
मोबाइल फोनचा तपशील माांगले मिळवायचा. त्यासाठी त्याचे हेर ठिकठिकाणी कार्यरत होते. वास्तविक, मोबाइल फोनच्या कॉल्सचा
तपशील स्वत: मोबाइल फोनधारकास किंवा तपासासाठी पोलिसांना
मिळू शकतो. मांगले मात्र
कुणाच्याही मोबाइल फोनच्या कॉल्सचा तपशील सहज मिळवायचा. हा तपशील मिळाला की, संबंधित
अधिकारी, राजकारणी किंवा
सेलिब्रिटी कुणाच्या वारंवार संपर्कात आहे, हे मांगलेला समजायचे. खंडणीकरिता धमकावण्यासाठी
हा तपशील तो शस्त्र म्हणून वापरायचा,
हे तपासामध्ये समोर आले आहे.
मांगलेने कुणाकुणाच्या मोबाइल
कॉल्सचे तपशील मिळवले, त्यांचा गैरवापर कसा केला, या मुद्द्यावर आता तपास सुरू आहे.
>दिल्लीच्या गौरवचा शोध
कुणाच्याही मोबाइल फोनचा तपशील मिळवण्यासाठी मांगले ज्यांची मदत घ्यायचा, त्यामध्ये दिल्ली येथील गौरव नामक व्यक्तीचे नाव समोर आले आहे. गौरव एखाद्या मोबाइल कंपनीशी संबंधित आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत. गौरवचा तपशील मांगलेकडून काढला जात असून लवकरच त्याच्या अटकेची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.