ठाण्यातील संगीत कट्ट्यावरील संगीतमय संध्याकाळ झाली देव आनंद मय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:51 PM2019-12-21T16:51:15+5:302019-12-21T17:00:07+5:30
नवोदित तसेच हौशी गायकांसाठी स्वतःच्या कलेच्या सादरीकरणासाठी हक्काचा कट्टा म्हणजे संगीत कट्टा.
ठाणे : संगीत कट्टा ५६ सजला युवा तसेच अनुभवी गायक आणि वादकांच्या सोबतच तरुण गायक वादकांनी देवानंद यांच्यावर चित्रित गीतांचे सादरीकरणाने कट्ट्यावरील संगीतमय संध्याकाळ देव आनंद मय झाली.
देव आनंद स्पेशल संध्याकाळ एक वेगळ्याच अर्थाने खास झाली.सादर कार्यक्रमात देव आनंद सारख्या चिरतरुण स्वरांच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण गायक आणि वादकांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून खरोखरच संध्याकाळ देव आनंद मय केली. *वासुदेव फणसे ह्यांनी 'जीवन के सफर मै','खोया खोया चांद'; दिलीप नारखेडे ह्यांनी हे 'अपना दिल तो आवारा' ,'फुलो को तारो का'; सुधीर जामखंडीकर 'हाय हाय रे निगाहे','कहा जा रहे थे';अनंत मुरे ह्यांनी 'मै आया हु'; पांडुरंग कदम ह्यांनी 'मेरा मन तेरा प्यासा','तेरे मेरे सपने','तू कहा है'; संदीप गुप्ता 'ख्वाब हो या हकीकत','न तुम हमे जानो'; प्रवीण शहा 'कोई सोने स दिलवाला','कल की दौलत आज'; सुधाकर कुलकर्णी ह्यांनी 'तू कही ये बता'; अरुण मांडलिया चल री सजणी ; किरण म्हाफसेकर ह्यांनी 'फुलो का तारोका'; हरीश सुतार ह्यानी 'तेरे मेरे सपने'; प्रणव कोळी ह्यानी 'ये दिल ना होता बेचारा' आणि राजू पांचाळ ह्यांनी 'ऐसें ना मुझे तुम देखो'* ह्या गीतांचे सुरेल सादरीकरण केले. कीर्ती जोशी आणि दिलीप नारखेडे ह्यांनी 'याद किया दिल' ; हरीश सुतार आणि पूजा ह्यांनी 'छोड दो आचल; राजू पांचाळ आणि निशा पांचाळ ह्यांनी 'अच्छा जी मै हारी'; विनोद पवार आणि बीना ह्यांनी 'पन्ना की तमन्ना है; ज्ञानेश्वर मराठे आणि गौरी ठाकूर ह्यांनी 'याद किया दिलने'; हरीश सुतार आणि कांचन ह्यांनी 'अभि ना जावो छोडकर','आसमा के नीचे'; किरण म्हाफसेकर आणि गौरी ठाकूर ह्यांनी आंखो मैं क्या जी;विनोद पवार आणि निशा पांचाळ ह्यांनी 'शौखिया मै'; ज्ञानेश्वर मराठे आणि बीना 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है'; किरण म्हाफसेकर आणि पूजा ह्यांनी 'कांची रे कांची'* ह्यां सुमधुर युगुल गीतांचे सादरीकरण केले.
ह्या सर्व युगुल गीतांमधील *विनोद पवार आणि साक्षी पवार ह्या बाप लेकीच्या जोडीने गायलेल्या 'गाता रहे मेरा दिल' ह्या गीताने रसिक श्रोत्यांची खास दाद मिळवली. या सोबतच तेजराव पंडागळे ह्यांनी 'लेके पहला पहला प्यार'* ह्या गीताचे बासरीवर सुरेल सादरीकरण केले. *दामिनी पाटील हिने 'दम मारो दम'* ह्या गीतांचे सेकसोफोनवर जबरदस्त सादरीकरण केले. *राज आणि कुणाल ह्या जोडीने सिंथेसायझर आणि ट्रम्प पॅड वर 'जब छाये मेरा जादू'* ह्या गीतांचे सादरीकरण करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.सादर *संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार आरती ताथवडकर ह्यांनी केले. आठवड्याभराच्या दगदगीनंतर शुक्रवारची संध्याकाळ रसिक श्रोत्यांना आनंदीत करणारी असावी आणि नवोदित आणि हौशी कलाकारांना संधी मिळावी म्हणूनच संगीत कट्टा सुरू करण्यात आला.आज देव आनंद विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ आणि तरुण गायक आणि वादकांनी स्वतःच्या कलेचे सादरीकरण करून खऱ्या अर्थाने चिरतरुण देव आनंद ह्यांना आदरांजलीच वाहिली असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.