ती २७ गावेच ठरणार किंग मेकर

By Admin | Published: November 2, 2015 01:56 AM2015-11-02T01:56:32+5:302015-11-02T01:56:32+5:30

२७ गावातील लोकांनी गेल्या ३२ वर्षांतून प्रथमच मतदानाचा हक्क बजावून मनपा की स्वतंत्र नगरपालिका या बाबतचा फैसला मतदान यंत्रात बंद केला.

It will be 27 villages for King Maker | ती २७ गावेच ठरणार किंग मेकर

ती २७ गावेच ठरणार किंग मेकर

googlenewsNext

अरविंद म्हात्रे, चिकणघर
२७ गावातील लोकांनी गेल्या ३२ वर्षांतून प्रथमच मतदानाचा हक्क बजावून मनपा की स्वतंत्र नगरपालिका या बाबतचा फैसला मतदान यंत्रात बंद केला. काटई येथील कार्यकर्त्यांचे भांडण वगळता २७ गावांत शांततेत मतदान पार पडले. यावेळी तरुण मतदारांना प्रथमच मतदान करता आले. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांचा उत्साह वाढलेला होता.
सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यातील सरळ सामना झाला असला तरी दोन्ही बाजूचे उमेदवार साथसाथ मतदान केंद्राबाहेर फिरताना दिसले. २७ गावांत बहिष्कार फुटला गेल्याने प्रचंड तणाव सदृष्य परिस्थिती होती. म्हणून काही गालबोट लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र कोणतीच घटना घडली नाही. सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत शांततेत मतदान झाले.
२७ गावेच ठरणार किंग मेकर
२७ गावातील मतदारांचा कौल कोणाला मिळेल याची उत्सुकता आहे. कारण २७ गावातूनच महापौर कोणाचा हे ठरणार आहे. एकंदरीत २७ गावे केडीएमसीचा महापौर बसविण्यात किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यानी आपली प्रतिष्ठा येथे पणाला लावली होती. कोण सरस ठरतो हे आजच्या निकालावरून स्पष्ट होईल.

Web Title: It will be 27 villages for King Maker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.