राज-पाटील भेटीबाबत पतंग उडविणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:26+5:302021-07-31T04:40:26+5:30

कल्याण : प्रत्येक पक्षाची भूमिका असते. नाशिकमध्ये मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

It is wrong to fly a kite regarding Raj-Patil meeting | राज-पाटील भेटीबाबत पतंग उडविणे चुकीचे

राज-पाटील भेटीबाबत पतंग उडविणे चुकीचे

Next

कल्याण : प्रत्येक पक्षाची भूमिका असते. नाशिकमध्ये मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यात सहज भेट झाली. त्यावरून पतंग उडविण्यात काही अर्थ नाही, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी केले.

कल्याण पूर्व भागातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी पार पडला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राजन वारे, अभिजित करंजुले, राजू कवठाळे, जिल्हा सरचिटणीस भारत फुलोरे, अर्जुन म्हात्रे, युवा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, महिला अध्यक्ष नगरसेविका रेखा चौधरी उपस्थित होते.

तावडे यांचे दुर्गाडी चौकात जोरदार स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर शहरातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. शिक्षण या विषयावर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

-----------------------

Web Title: It is wrong to fly a kite regarding Raj-Patil meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.