जगन्नाथ पाटील यांनीच विजय मल्ल्याला खरा धडा शिकवला - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 09:46 PM2019-07-29T21:46:03+5:302019-07-29T22:11:11+5:30
सोमवारी पंचाहत्तरी जगन्नाथाची या पाटील यांच्या अमृत महोत्सव निमित्त सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डोंबिवली: माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात दारुवर एमआरपी लागू केली. त्या काळातच विजय मल्ल्या याने त्यांना विशेष ऑफर दिली होती हे सर्वश्रृत आहे. पण त्यांनी ती नाकारली, हे भाजपा आणि संघाचे संस्कार असून त्यामुळे त्यांनी तसे केले नाही. याचाच अर्थ असा होतो की, जगन्नाथ पाटील यांनी खऱ्या अर्थाने विजय मल्ल्याला धडा शिकवला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवारी पंचाहत्तरी जगन्नाथाची या पाटील यांच्या अमृत महोत्सव निमित्त सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार सुभाष भोईर, आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्यांनी जनसंघ, भाजपा असा दीर्घ प्रवास करत, ठाणे पालघर जिल्ह्यात पक्ष रोवला, सातत्याने पक्षासोबत राहून विचारांची कास सोडली नाही, त्यांची आज पंचात्तरी आहे. मोदींसारखे नेतृत्व, प्रचंड विजय सगळीकडे मिळतो आहे. हे खूप चांगले आहे, परंतु त्यासाठी खूप कष्ट घेतले ते जगन्नाथ पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी. कळसाचा पाया हे पुस्तक त्यांच्या कन्येने लिहिले हे खरे आहे.
मिशन म्हणून पक्षाचे कार्य त्यांनी सातत्याने केले. जगन्नाथ पाटील खासदार, आमदार मंत्री झाले, सत्ता असो नसो, पद असो नसो त्यांच्यात बदल झालेला नाही, त्यांनी सतत काम केले. पदाने ते सतत हुरळून गेले, विचारासाठी काम केले हे आजच्या भर पावसातली उपस्थिती दर्शवत असल्याने आजचा सत्कार सोहळा खूप महत्त्वाचा आहे.
पाटील यांच्याबद्दल खूप गोष्टी सांगता येतील, पुस्तकात ते नमूद आहेच, 1964 ते 1974 या काळात ते पी जगन्नाथ नावाने जादूचे प्रयोग करायचे विलक्षण जादूचे प्रयोग केले म्हणून ते प्रख्यात होतेच पण 1974 नंतर त्यानी सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर जादू केली. त्यांनी लोकांच्या मनावर मोहिनी घातली ती त्यांच्या कार्याने असेही ते म्हणाले. पहिल्यांदा ते आमदार झाले, त्यानंतर रामभाऊ म्हाळगीनच्या निधनानंतर त्यांना खासदरकी मिळाली. त्यानंतर मात्र ते पुन्हा आमदार झाले आणि मंत्री झाले, त्यांच्या कारकिर्दीत त्यांना डाग लागला नाही.
एमआरपी त्यांनी आणली हे त्यांचे सगळ्यात मोठे कार्य आहे. त्यांनी तो कोणत्याही दबावाला बळी पडला नाही. तेव्हापासून हजारो कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळतो. सभागृहात त्यांनी कधीही वेळ मोडली नाही. पूर्ण वेळ विधानसभा अधिवेशन उपस्थिती त्यांनी लावली. त्यांचा स्वभाव हा शांत आहे, हा त्यांचा स्थायी भाव असल्याचे ते म्हणाले. आगरी भूमीपुत्र हे वेळ प्रसंगी रागवतात, प्रेम करतात. पण पाटील हे आक्रमक नसून डोकं शांत ठेवून कार्य करतात पद नसलं तरी माझी जबादारी आहे असं मानून पाटील यांनी काम।केले. 2009, 2014, 2019 या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचंड काम केले. त्यांना जी जबाबदारी दिली ते काम पूर्ण केले असे पाटील यांचे कार्य आहे.
डोंबिवली सीएम स्पीच अलीकडे कोणी रिपोर्ट देत नाहीत पण पाटील यांनी सतत रिपोर्ट दिला आहे. ते खऱ्या अर्थाने जीवन जगले, ज्यांनी पक्ष टिकवला हे जगन्नाथ पाटील यांनी केले आहे, आम्हाला खूप शिकायला मिळाले. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांपैकी पाटील हे आहेत. त्यांना साथ दिली ती पुष्पा पाटील यांनी, त्यांनी साथ दिली आहे, म्हणून ते खूप कार्यरत राहिले आहेत. जनतेचे शतायुषी होईस्तोवर आपल्याला आशीर्वाद आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आणि सोहळ्याचा समारोप झाला.
- या सोहळ्याला माजी पालकमंत्री गणेश नाईक येणार होते, परंतु ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा झाल्याने त्यांनी या ठिकाणी येणे टाळले. तसेच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एका व्यासपीठावर एकत्र येतात का? अशीही चर्चा जिमखाना सभेच्यास्थळी सुरू होती. परंतु गणेश नाईक न आल्याने ते भाजपामध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.