ठाण्यात रंगला "जागर मालवणीचो" कार्यक्रम

By admin | Published: April 13, 2017 08:58 PM2017-04-13T20:58:19+5:302017-04-13T20:58:19+5:30

मालवणी भाषेच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फेसबुक वरील ४४,००० पेक्षा जास्त सिंधुदुर्गकर सामील असलेल्या माझा सिंधुदुर्ग या ग्रुपने जागर मालवणीचो हा विशेष कार्यक्रम

"Jagar Malavani Chow" program in Thane | ठाण्यात रंगला "जागर मालवणीचो" कार्यक्रम

ठाण्यात रंगला "जागर मालवणीचो" कार्यक्रम

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - मालवणी भाषेच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून  फेसबुक वरील ४४,००० पेक्षा जास्त सिंधुदुर्गकर सामील असलेल्या माझा सिंधुदुर्ग या ग्रुपने जागर मालवणीचो  हा विशेष कार्यक्रम नुकताच भारतीय स्त्री जीवन विकास परिषद मंदिर सभागृह , ठाणे पूर्व येथे आयोजित केला. यावेळी मराठी नाट्य आणि दुरचित्रवाणीवरील  कलाकारांसह माझा सिंधुदुर्गचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
अलीकडच्या काळात टीव्ही सिरीयल , नाटके तसेच चित्रपटामधून आपल्या अनोख्या शैलीत लोकप्रिय झालेली, ऐकण्यास व बोलण्यास मधुर - रसाळ अशी मालवणी भाषा ही मालवणी माणसाची अस्सल ओळख. मालवणी भाषेचे माहेरघर सिंधुदुर्ग मधे बोलली जाणारी ही बोलीभाषा शहरी भागात मात्र आपले अस्तित्व हरवत चालली आहे . तरुण -तरुणी ,उच्चशिक्षीत तसेच बहुतांश शहरी चाकरमान्यांमध्ये दैंनदिन जीवनात मालवणीचा वापर कमी होताना दिसतोय. महान कोकणी नटसम्राट मा. मछिंद्र कांबळी उर्फ बाबुजी यांनी वस्त्रहरण च्या माध्यमातून सर्वप्रथम मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहोचवली व मालवणी भाषेला खरी ओळख मिळवून दिली. बाबुजीनी घेतलेला हा वसा पुढे चालू ठेवण्याच्या कार्यांत आपला खारीचा वाटा म्हणून माझा सिंधुदुर्ग या फेसबूक ग्रुपने पुढाकार घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन वस्त्रहरण या मालवणी नाटकात गोप्या ची भूमिका साकारून रसिकांना खदखदून हसवणारे मालवण चे सुपुत्र लवराज कांबळी , जगविख्यात अक्षर  गणेश कलाकार राज कांदळगावकर , झी चौवीस तास वाहिनीवरील चला हवा येऊद्या फेम , सिने नाट्य अभिनेता दिव्येश शिरवंडकर, प्रसिद्ध छायाचित्रकार व सिंधुतीर्थ या सिंधुदुर्ग वरील आधारित छायाचित्र प्रदर्शन भरवून सिंधुदुर्ग ची वेगळी ओळख करून देणारे प्रल्हाद भाटकर तसेच प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार व विविध पुरस्कार प्राप्त प्रकाश कदम हे उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात श्री .मांडकरी देव प्रतिष्ठान व सिंधुसेवा प्रबोधिनी देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने  घुमट या मालवणी लोककलेने झाले . त्यानंतर माझा सिंधुदुर्ग ग्रुप मधील हौशी कलाकारांनी मिळुन  मालवणी ऱोम्बाट  हा कलाप्रकार सादर केला . यामध्ये राजेश राणे , राम साळुंके , रितेश तेजम , नितीन राणे , मनोज गावडे ,ऋषिकेश राणे , दूर्वांक कांदळगावकर , आर्यन सावंत, यांनी विविध वेशभूषा साकारून होळीच्या ऱोम्बाटाची आठवण करून दिली .यावेळी माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे अध्यक्ष -अॅडमिन विकास पालव यांनी या कार्यक्रमामागची आपली भूमिका स्पष्ट करत दैंनदिन जीवनात मालवणीचा वापर करण्याचे आवाहन केले. 
 

Web Title: "Jagar Malavani Chow" program in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.