VIDEO : जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 7, 2023 06:28 PM2023-09-07T18:28:02+5:302023-09-07T18:28:34+5:30
मनसे दहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे.
ठाणे : मनसेदहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे. पहिल्यांदाच ठाण्यातील मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात राज ठाकरे उपस्थित झाले आहे. ठाण्यातील दहीहंडीच्या व्यासपीठावर येण्याची राज यांची ही पहिलीच वेळ आहे. जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी दिली. नऊ थरांची सलामी देऊन जय जवान गोविंदा पथकाने चषक जिंकला. त्यांना मनसेची पहिली हंडी फोडण्याचा मान देण्यात आला.
जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी...!#thane#MNS#RajThackeray#dahihandi2023#dahihandipic.twitter.com/rm2X1Ywt8F
— Lokmat (@lokmat) September 7, 2023
ठाण्यातील मनसेच्या दहीहंडी उत्सवात राज ठाकरेंची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी त्यांनी सांगितले की, दहीहंडी बघण्यात गुंग होतो. जय जवान गोविंदांना सलाम. पहिल्यांदा दहीहंडी उत्सवात आलो. पहिल्यांदाच काही न बोलता इतका वेळ उभा राहिलो. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सण उत्सव साजरे करा, बंदी आणण्याचा प्रयत्न केला, कोर्टाकडून बंदी आणण्याचा प्रयत्न केला. पण मी ठाम उभा राहिलो. हिंदू सणांवर बंदी आणणार पण तसे काही होऊन देणार नाही. हा सण साजरा करणाऱ्या अविनाश जाधव आणि टीमला धन्यवाद देतो.