२७ गावांची सुनावणी लांबणीवर
By Admin | Published: March 8, 2016 01:56 AM2016-03-08T01:56:15+5:302016-03-08T01:56:15+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.
चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना निकालासाठी पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.
२७ गावे महापालिकेत कायम ठेवायची की वगळायची, याबाबत राज्य सरकारने ७ मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश २३ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबतची सुनावणी सोमवारी न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठापुढे होणार होती.
मात्र, खंडपीठ बदलल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. दुसरीकडे राज्य सरकारनेही प्रतिज्ञापत्र सादर सादर केलेले नाही. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे गावागावांत विविध चर्चांना उधाण आले आहे.