कारागृहातील कैद्यांना राखी बांधून भव्य-दिव्य रक्षाबंधन साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:35 AM2018-08-27T04:35:41+5:302018-08-27T04:36:02+5:30
भव्यदिव्य रक्षाबंधन उत्सव : भाजपा कल्याण ग्रामीणतर्फे केले होते आयोजन
डोंबिवली : भाजपा कल्याण ग्रामीणतर्फे दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात तब्बल १२ हजार महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या भाऊरायाला राख्या बांधल्या. तसेच स्थानिक नगरसेविका रवीना माळी आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यंदा या उत्सवाला ‘अटलबंधन’ असे नाव देण्यात आले होते. माळीबंधूतर्फे महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून प्रत्येकी स्टीलची भांडी, धान्य तसेच साडी अशी भेट देण्यात आली. भोपर, देसलेपाडा, लोढा हेरिटेज या परिसरातील तब्बल १२ हजार महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. या उत्सवाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मानपाडा पोलीस ठाण्याचे व पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, नगरसेविका रवीना माळी, नगरसेवक संदीप पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप माळी म्हणाले, अनेक वर्षांपासून या महिला रक्षाबंधनासाठी या उत्सवात सहभागी होतात. विशेष म्हणजे घरी रक्षाबंधन सण असूनही पहिल्यांदा या उत्सवाला येतात आणि मला राखीसुद्धा बांधतात, असे सांगितले.
च्मुख्याध्यापक गुलाब पाटील यांनी आरोपींना आपला भूतकाळ विसरून भविष्यकाळाचा
विचार करा. येथून आदर्श नागरिक बनून जा, असे सांगितले. यावेळी कारागृह अधीक्षक बी.एन. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बळवंत काळे, महिलारक्षक स्मिता तायडे व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
च्पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल या कल्याण पूर्वेकडील शाळेतील नववीच्या मुलींनी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात जाऊन कैदीबांधवांना राख्या बांधल्या. तर, महिला शिक्षकांनी पोलीसबांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
कल्याण जिल्हा कारागृहात कैदीबांधवांना बांधल्या विद्यार्थिनींनी राख्या