जालान, पुजारीसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:01 AM2018-06-05T01:01:08+5:302018-06-05T01:01:08+5:30
मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाच्या कोठडीत असलेल्या सोनूच्या अडचणीत भर पडली आहे.
आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर खेळांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलान याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली. एकीकडे त्याची वरील प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असतानाच बोरिवलीतील एका व्यापाºयाने अपहरण, खंडणी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा १ जून २०१८ रोजी दाखल केला आहे. सोनू जलान, गँगस्टर रवी पुजारी, मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा आदींनी आपसात संगनमत करून या व्यापाºयाकडे तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली. सोनूला खंडणीविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर या व्यापाºयाने ठाणेनगर पोलीसांत तक्रार दाखल केली. क्रिकेटवरील सट्ट्यासंदर्भात सध्या सोनूची चौकशी सुरू आहे. त्याची कोठडी ६ जूनला संपल्यानंतर त्याला पुन्हा या नव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.