भातसा धरणातून पाणी साेडून जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:40+5:302021-08-22T04:42:40+5:30

भातसानगर : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी चार मीटर पाणीपातळी ...

Jalpujan by pouring water from Bhatsa dam | भातसा धरणातून पाणी साेडून जलपूजन

भातसा धरणातून पाणी साेडून जलपूजन

Next

भातसानगर : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी चार मीटर पाणीपातळी शिल्लक असली, तरी नदीला वाट करून देण्यासाठी शनिवारी २.३० वाजता भातसा धरणावर जलपूजन करण्यात आले. त्यासाठी धरणाचे दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी शहापूरच्या आमदार दौलत दरोडा, आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद ठाणे कृषी सभापती संजय निमसे, कार्यकारी अभियंता योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपस्थित मनोज विशे आदी उपस्थित होते.

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणावर जलपूजन करण्यात आले. प्रथेप्रमाणे नदीला वाट करून द्यायची असते आणि वाट करून देताना या नदीला साडीचोळी अर्पण केली जाते व दुपारी २.३० वाजता या धरणाची पातळी १३८ मीटर असताना जलपूजन करण्यात आले. मात्र, धरण भरून वाहण्यासाठी १४२ इतकी पाणी पातळी आवश्यक आहे. त्यामुळे धरण भरून वाहण्यासाठी अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. धरणाची पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर असून, शनिवारपर्यंत १३७.८६ मीटर पातळी गाठली. धरण क्षेत्रात आज ९.०० मिमी पावसाची नाेंद झाली. आतापर्यंत या क्षेत्रात १९२३.०० मिमी पाऊस झाला आहे.

भातसा धरणाची क्षमता

पूर्ण संचय पातळी : १४२.०७ मीटर

२१ ऑगस्टपर्यंत पाणी पातळी : १३७.८६ मीटर

उपयुक्त पाणीसाठा : ८२९.९८१ द.ल.घ.मी.

एकूण पाणीसाठा : ८६३.९८१ द.ल.घ.मी.

पूर्ण संचय साठा : ९७६.१०

पाणीसाठी : ८८.०९ टक्के

Web Title: Jalpujan by pouring water from Bhatsa dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.