ठाण्यात ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Published: January 24, 2024 09:16 PM2024-01-24T21:16:56+5:302024-01-24T21:17:08+5:30

ठाणे: कासारवडवली पोलिस ठाण्याचे जमादार सुनिल रघुनाथ खैरे (५४, रा. कोपरी, ठाणे) यांचा ठाणे ह्दयविकाराचा झटका आल्याने बुधवारी सायंकाळी ...

Jamadar on judicial duty dies of cardiac arrest in Thane | ठाण्यात ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू

ठाण्यात ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू

ठाणे: कासारवडवली पोलिस ठाण्याचे जमादार सुनिल रघुनाथ खैरे (५४, रा. कोपरी, ठाणे) यांचा ठाणे ह्दयविकाराचा झटका आल्याने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, २६ वर्षीय मुलगा आणि २३ वर्षीय मुलगी असा परिवार आहे.

कासारवडवली पोलिस ठाण्यात न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी म्हणून खैरे हे कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना काही पाेलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने चरईतील डॉ. कुंबळा यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. एका कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकाऱ्याला गमविल्याची भावना कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

Web Title: Jamadar on judicial duty dies of cardiac arrest in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.