जमील शेख हत्याकांड: शहीदच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:44 PM2020-12-07T23:44:18+5:302020-12-07T23:47:25+5:30

जमील शेख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीत आणखी एक दिवसांची वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. यातील फरारी हल्लेखोरांचा अद्यापही शोध न लागल्यामुळे तपास पथकाची चिंता चांगलीच वाढली आहे.

Jamil Sheikh murder: Increase in police custody of martyrs | जमील शेख हत्याकांड: शहीदच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ

तपास पथकाची चिंता वाढली

Next
ठळक मुद्देअन्य दोघांची मात्र अजूनही हुलकावणी तपास पथकाची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीत आणखी एक दिवसांची वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. यातील हल्लेखोरांचा अद्यापही शोध सुरूच असून फरार झालेल्यांपैकी कोणीही तपासपथकाच्या हाती न लागल्यामुळे पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे.
शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी शाहिद शेख याला अटक केली होती. त्याला सुरुवातीला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. चौकशी पूर्ण न झाल्यामुळे त्यानंतर पुन्हा ७ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर त्याला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले. या हत्याकांडातील त्याच्या अन्य दोन साथीदारांचा अजूनही शोध लागलेला नाही. हल्लेखारांनी वापरलेले रिव्हॉल्व्हर आणि मोटारसायकलही मिळाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी ठाणे न्यायालयात केली. ती मान्य करून त्याला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Jamil Sheikh murder: Increase in police custody of martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.