उल्हासनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जमीर लेंगरेकर, दोघांची नावे शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:56 IST2025-01-10T19:55:06+5:302025-01-10T19:56:18+5:30
लेंगरेकर यांनी महापालिकेत चांगले काम केल्याने, त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार द्यावा, असा घाट सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्याकडे घातल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जमीर लेंगरेकर, दोघांची नावे शर्यतीत
उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, आयुक्त पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे देण्यात आला. अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ, आयुक्त पदाचा प्रभारी पदभार दिलेले अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची नावे आयुक्त पदासाठी चर्चेत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची गेल्या ऑगस्ट महिन्यात आयुक्त पदी नियुक्ती झाल्यावर, त्यांनी अवघ्या ४ महिन्याच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे मार्गी लावली. तसेच खुल्या जागेत व रस्त्याच्या बाजूला हरितपट्टा तयार करणे, अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीचा प्रश्न शासनकडे लावून धरून आयुक्त व महापौर बंगल्याला प्राधान्य, नवीन महापालिका इमारतीचा आराखडा मंजूर घेणे आदी कामे करून घेतली. महापालिकेची स्वतःची पाणी पुरावठा योजना प्रस्तावासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले होते. यादरम्यान त्यांची अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली.
महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे दिला. लेंगरेकर स्वतः आयुक्त पदाच्या शर्यतीत असून, अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नावाचीही चर्चा आहे.
लेंगरेकर यांनी महापालिकेत चांगले काम केल्याने, त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार द्यावा, असा घाट सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्याकडे घातल्याचे बोलले जात आहे. सोमवार पर्यंत महापालिकेच्या आयुक्त पदाचा तिढा सुटणार असल्याचेही बोलले जात आहे.