Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:48 AM2019-08-06T00:48:56+5:302019-08-06T06:45:58+5:30

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा

Jammu & Kashmir article 370 Our homeland is waiting for us | Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

Next

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली: आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय. आमच्या मातापित्यांना बाहेर हुसकावण्यात आले, हे दु:ख अव्यक्तच आहे. आता मात्र आम्ही स्वाभिमानाने आमच्या घरी, नंदनवनात जाऊ शकतो, यापेक्षा स्वर्गीय आनंद काय असेल, असे भावपूर्ण उद्गार काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबई या संस्थेचे सचिव सुनील रंजन कौल यांनी ‘लोकमत’कडे काढले.

काश्मीरचे कलम ३७० हटवून आम्हाला केंद्र सरकारने मोठा अनमोल ठेवा दिला असल्याचे खारघर येथे कुटुंबीयांसमवेत वास्तव्याला सुनील रंजन कौल यांनी सांगितले. मुंबईसह देशभरात अन्यत्र कार्पेट, सतरंज्या विकणारे काही उपद्रवी काश्मीरमध्ये बंदुका हातात घेतात. तिथल्या गोरगरिबांवर, मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करतात. त्यांना या निर्णयामुळे मोठी चपराक बसली आहे. सरकारच्या वाटचालीकडे आता काश्मिरींचे लक्ष लागल्याचे कौल म्हणाले.

कौल म्हणाले की, अनेक वर्षांनी आम्हाला मोकळे वाटतेय. मनामध्ये एकीकडे खूप आनंद तर दुसरीकडे जन्मभूमीकडे जाण्याची ओढ आहे. आनंदामुळे खरेतर शब्द फुटत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत २० हजारांहून अधिक संख्येने राहणाऱ्या काश्मीरच्या नागरिकांची सध्या हीच अवस्था आहे. ३७० कलम हटणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारच्या या निर्णयामुळे तो सोनियाचा दिन आलाच. ज्या सरकारमध्ये हिम्मत असते, तेच असा निर्णय घेऊ शकतात. आता भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच देशातील कोणताही बांधव काश्मीरमध्ये येऊ शकतो. त्याला कोणतेही दडपण, भीती बाळगण्याची गरज नाही. तिथे येऊन सृष्टीसौंदर्याची मजा लुटा, भारताचे नंदनवन काय असते, हे प्रत्येकाने अनुभवावे. राज्य सरकारची सक्ती, मनमानी आणि दबावतंत्र नष्ट होईल. पण, खºया अर्थाने यापुढे केंद्र सरकारची जबाबदारी मोठी आहे. यानंतर येथून तिकडे जाणाºया मूळ काश्मिरी नागरिकांची सुरक्षा, त्यांना रोजगाराची हमी केंद्राला द्यावी लागेल.

आगामी काळात तेथे कंपन्या कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, त्या जोरावर तेथील मूळ काश्मीरचा रहिवासी तेथे जायला तयार होईल. ज्या सुखसुविधा त्यांना महाराष्ट्रात तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मिळतात, तशाच सुखसुविधा काश्मिरात मिळाल्या, तर निश्चितच कुटुंबासह सगळे तेथे जाणार, असे कौल म्हणाले.

सुनील कौल यांचे आईवडील हे श्रीनगर येथील लालचौक, करणनगर येथे वास्तव्याला होते. गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल १९९० मध्ये त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतच वास्तव्य केले. कौल यांचे आईवडील हयात असून त्या दोघांनाही केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाला आहे, असे कौल यांनी सांगितले.

‘रोजगाराचा प्रश्न सुटला तर युवक जातील’ : मूळचे श्रीनगर येथील अजय धर १९८५ नंतर अगोदर मुंबईत व आता ठाण्यात वास्तव्य करतात. काश्मीरमधील सरकारी खात्यात नोकरी करताना आलेला दबाव, मनमानीला कंटाळून मुंबईत आले. महाराष्ट्रात बंधुभाव अनुभवायला मिळाला, असे आवर्जून नमूद करणारे धर म्हणतात की, आता येथील नागरिकांनीही काश्मीरला यावे, तिथली संस्कृती बघावी, तिथले वेगळेपण अनुभवावे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.

मात्र, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्यावरच कुटुंबांतील युवकांना तेथे जायला आवडेल. आता केवळ ३७० कलम हटवण्याचा निर्णय झाला असून सगळे सुटसुटीत व्हायला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली व्हायला काहीसा वेळ जाईल. त्यानंतर, पुन्हा काश्मीरला जायचे आणि वास्तव्य करायचे याहून वेगळा आनंद, सुख काय असेल?

Web Title: Jammu & Kashmir article 370 Our homeland is waiting for us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.