जनता बेजार, नगरसेवक पसार १३० नगरसेवकांची जनता उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:17 PM2020-04-18T15:17:55+5:302020-04-18T15:19:13+5:30

कोरोनाच्या काळात मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक सामाजिक संस्था, काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे नगरसेवक प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करीत आहेत. परंतु अनेक प्रभागातून नगरसेवक हा प्रकारच या काळात गायब झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदानासाठी घरोघरी फिरणाºया या नगरसेवकांना आता ही गरीब मंडळी शोधत आहे.

Janata Bejar, corporator disseminated | जनता बेजार, नगरसेवक पसार १३० नगरसेवकांची जनता उपाशी

जनता बेजार, नगरसेवक पसार १३० नगरसेवकांची जनता उपाशी

Next

ठाणे : निवडणुकीच्या काळात घराघरात किती माणसं राहतात, कोणाच्या घरची परिस्थिती बिकट आहे, कोणाच्या घरातला माणूस गावी गेला आहे, त्यातही निवडणुकीच्या निमित्ताने व्होटर स्लीपही प्रत्येकाच्या घरात न शोधताही पोहचविल्या जातात. त्यानुसार प्रभागाची सविस्तर माहिती असणारा नगरसेवक कोरोनाच्या भीतीने मात्र आपल्याच प्रभागातून गायब झाल्याचे चित्र ठाण्यातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच काही नगरसेवक हे आपल्या प्रभागात किंबहुना इतर प्रभागतही मदत करतांना दिसत आहे. मात्र इतर कुठल्या बीळात शिरुन बसले आहेत, याचा थांग पत्ता लागतांना दिसत नाही. त्यामुळे संकटसमयी नगरसेवक कामाला येईल या आशेने उपासमार होऊ लागलेले लोकं नगरसेवकांचे कार्यालय आणि घरांसमोर घोंघावताना दिसत आहेत.
                 महाराष्ट्र लॉक डाऊन करण्यात केंद्रापेक्षा एक पाऊल पुढे आहे. परंतु महाराष्ट्राचे हे पुढे असलेले एक पाऊलच असंघिटत कामागरांची उपासमार करणारे ठरू लागले आहे. पहिल्या टप्प्यातील लॉक डाऊनचा कार्यकाळ संपल्यानंतर तो काही प्रमाणात शिथिल होईल असे लोकांना वाटत होते. मात्र राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत त्याचा कार्यकाळ वाढविला. त्यानंतर केंद्राने ३ मे पर्यंत देशभरातला लॉक डाऊन कायम ठेवला. त्यामुळे लोकांचे हाल वाढू लागले आहेत. ठाण्यात राहणाऱ्या असंघटीत कामगारांच्या कुटुंबांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. पहिल्या लॉक डाऊनच्या काळाला २७ दिवस होऊन गेले असल्याने आता त्यांना एक वेळेचेही जेवण मिळेनासे झाले आहे. नाक्यावर काम करणारा मजूर, कचरावेचक कुटुंब, बांधकाम करणारा कामगार, घरकाम करणारी महिला, लहान उद्योग करणारा कारागीर, फेरीवाला असा मोठा वर्ग उपासमारीच्या संकटात सापडला आहे. अनेकांकडे तर शिधावाटप दुकानांमधून दिले जाणारे स्वस्त धान्य खरेदी करायलाही पैसा शिल्लक राहिला नाही. शासनाच्या चुकीने अनेकांच्या शिधा पत्रिका आधारलिंक झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची धान्य मिळेनासे झाले आहे. काही वस्त्यांमधून काही संस्था गरिबांना एक-दोन वेळेचे जेवण पुरवीत आहेत. परंतु बºयाच संस्थांचीही रसद संपत आली आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबियांना आता नगरसेवकांचाच आधार राहिला आहे. घरात असलेल्या मुला-बाळांची उपासमार बघवत नसल्याने पोलिसांचा पहारा चुकवीत कुटुंब प्रमुख त्याच्या वस्तीत असलेल्या नगरसेवकांच्या कार्यालयाजवळ फेºया मारताना दिसत आहेत. कार्यालयांना कुलूप असल्याने उपासमार होत असलेली महिला नगरसेवकांचे घर गाठीत आहे. मात्र तिथेही निराशा पदरी पडत आहे. ज्या नागरसेवकांची भेट होतेय ते शासनाकडून मदत येणार आहे, शिधावाटप दुकानात जा, असे सल्ले देत आहेत. परंतु तेथेही मदत मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे अजून किती दिवस उपाशी राहायचे आमि जगायचे तरी कसे? असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दरम्यान शहरात शिवसेनेच्या माध्यमातून काही नगरसेवक, पदाधिकारी मदत पोहचवित आहे. तसेच काही नगरसेवक देखील स्वत:हून मदत देण्याचे काम करीत आहे. तर यामध्ये राष्टÑवादीचेही काही नगरसेवक पुढाकार घेतांना दिसत आहे. परंतु ही संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. इतर नगरसेवक गेले कुठे असा सवाल मात्र आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यातील काही नगरसेवकांशी संपर्क साधला असता, त्यांचे म्हणने आहे की, मदत द्यायला हरकत नाही, परंतु कोरोना झाले तर काय करणार म्हणून मदत करण्यासही काही नगरसेवक तयार नल्याचे दिसत आहे.


  • ठाणे महानगर पालिकेच्या एका प्रभागातून लोकांनी चार नगरसेवक निवडून दिले आहेत. १३० नगरसेवक निवडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये ६५ नगरसेवक महिला आहेत. तरीही त्यांना त्यांच्या प्रभागातील लोकांची उपासमार दिसत नाही. निवडणुकीच्या काळात गल्लीबोळात फिरून लोकांच्या अडचणींची चौकशी करणारा नगरसेवक संकटात कोठे आहे? त्या त्या प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्र येऊन लोकांची उपासमार थांबविली पाहिजे.

- राजीव धोत्रे, समाजसेवक


  • रोज नाक्यावर गेल्यावर संध्याकाळी घरात चूल पेटायची. महिना होत आला घरात बसून आहे. काबाडकष्ट करण्यापेक्षा घरात बसायला मिळत असेल तर ते कोणाला नको आहे. पण ज्याच्या कुटुंबाचे पोट मजुरीवरच असेल तर त्याने घरात कसे बसायचे? त्यामुळे मोठी अडचण आली आहे. पोलीस घरातून बाहेर जाऊ देत नाहीत, मुलं उपाशी असल्याने घरात बसने कठीण झालेय. अशावेळी दारात मते मागायला येणाऱ्यांकडे जाण्याशिवाय आम्ही कोणाकडे जायचे?

- शिवराज चिकटे, नाकाकामगार
 

 

Web Title: Janata Bejar, corporator disseminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.