केडीएमसी जिंकण्यासाठी काँग्रेसच्या १२ मंत्र्यांचा जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:23+5:302021-08-27T04:43:23+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे. यासाठी काँग्रेसचे ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे. यासाठी काँग्रेसचे १२ मंत्री हे कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घेणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बुधवारी मुंबईला बैठक घेऊन संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी निवडणूक स्वबळावर लढविली जाईल, असा निर्धार करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे असे आदेश दिले. निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सत्तेतील काँग्रेस पक्षाचे १२ मंत्री हे कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घेणार आहेत.
दरम्यान, पक्षाचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने २०१८ सालापासून लावून धरली आहे. ती काँग्रेस पक्षाची मागणी आहे. मी प्रदेशचा सचिव व नामकरण समितीचा सदस्य या नात्याने सांगतो. गुरुवारी पोटे यांच्या पुढाकाराने पदाधिकारी नवीन सिंग, रवी पाटील, शकील खान यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूककोंडी, स्मार्ट सिटी, बीएसयूपी प्रकल्प, वाढते प्रदूषण आदी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.
--------------------------