समाजकार्यासाठी झिंगूबाईंची वाटचाल, न्यूयॉर्कमधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:09 PM2018-04-20T22:09:45+5:302018-04-20T22:09:45+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांना सन्मानित केले.
ठाणे - चूल-मूल हेच पाहू नका गं..गुलामीत राहू नका…, पुरूषाप्रमाणे स्त्री समान गं… रत्न हिऱ्यांची ती आहे खान…अशा काव्यपंक्तीतून स्त्रीयांचे भूषण् असल्याचे ठामपण् सांगत आजही समाजात स्त्री पुरूष समानता आणखी रूजली पाहिजे. तिचे हक्क मिळाले पाहिजे, समाजातून वृद्धाश्रम कमी झाली पाहिजे असे मत स्त्री उद्धारासाठी आणि समाजसेवेसाठी झटणाऱ्या झिंगुबाई बोलके यांनी मांडले .त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांना सन्मानित केले. अमेरिकेहून आल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या वतीने सन्मानित केले.
बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावात नामदेव आण् पंचफुला या तायडे दाम्पत्याच्या पोटी १ जुलै १९५५ रोजी जन्माला आलेलया व जन्म:च पायाने अपंग असणाऱ्या झिंगूबाईंना आर्थिक परिस्थितीमुळे ४ थीपर्यंत शिक्षण् झाले. निंदण् खुरपण् करून त्या आईवडिलांना मदत करू लागल्या. वडील कविता करायचे तोच छंद म्हणून आत्मसात केला. समाजातील प्रश्न त्या कवितेतून मांडू लागल्या. एक पायाने अपंग असल्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत विवाह झाल्याचे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भगवान गौतम बुद्ध् आणि गाडगेबाबांवरील पुस्तके वाचून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
साक्षरता आणि व्यसनमुक्तीवर गावागावांत प्रबोधन केले. ‘स्वामिनी’ अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणे, पुण्याच्या मासूम संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षण् घेतले, महिलांचे ५०० बचतगट,अंध, अपंग, कुष्ठरोगी, विधवा, परित्यक्ता महिलांना अनुदान मिळवून देणे असे कार्य केले. दिल्लीच्या महिला संसदेत अकोला जिल्ह्याची प्रतिनिधी म्हणून शेतकरी आत्महत्या, विधवा, स्त्री-पुरूष समानता, भ्रणहत्या, हुंडाप्रथाविरोध्, अपंगांना न्याय या विषयावर परखड मत मांडले. महिलांनी चूल आणि मूल या चौकटीत अडकून न पडता त्या साक्षर बनाव्यात यासाठी त्यांनी समाजाचा मोठा रोष पत्करत आपलं घर गमवावं लागले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांचा शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सून राजश्री बोलके, मुलगा प्रदीप बोलके, समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव, संतोष् साळुंख्, महेश विनेरकर उपस्थित होते.