मानवी मेंदूच्या वागणुकीवर जावडेकर यांनी टाकला प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:26 AM2019-10-21T01:26:33+5:302019-10-21T01:26:38+5:30

५० हजार वर्षांत मेंदूचा विकास

Javadekar sheds light on the behavior of the human brain | मानवी मेंदूच्या वागणुकीवर जावडेकर यांनी टाकला प्रकाश

मानवी मेंदूच्या वागणुकीवर जावडेकर यांनी टाकला प्रकाश

Next

ठाणे : मेंदू हा सतत दक्ष असतो, असे नसून तो अनेकदा फसू शकतो. नसलेल्या गोष्टीही तो कधी दाखवतो व त्या आहेत असा आपल्याला भास निर्माण होतो, अशा शब्दांत विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या अशा तºहेवाईक वागणुकीवर प्रकाश टाकला.

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. त्यांनी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून मेंदूच्या अनेक चकित करणाऱ्या रहस्यांवर प्रकाश टाकला. शुक्रवारी पार पडलेल्या समारोप सोहळ्यात त्यांचा मानवी वर्तन आणि मेंदूविज्ञान हा कार्यक्र म पार पडला. यावेळी लेखकवाचक संवाददेखील आयोजिला होता. वीस लाख वर्षांपूर्वी मानव अस्तित्वात आला असला तरी, मानवी मेंदूचा विकास हा गेल्या ५० हजार वर्षांत अधिक झाला, असे त्यांनी सांगितले. मानवी मेंदूमध्ये दोन यंत्रणा काम करत असतात, क्षणिक निर्णय आणि विचारपूर्वक सावकाश निर्णय गरजेप्रमाणे मेंदू घेत असतो. संकटातून मानवाचे रक्षण करणे, हेच मेंदूचे मुख्य कार्य असते. मेंदूतील आठवणी या चिरेबंदी नसतात. अनेक रंजक उदाहरणे देऊन मेंदूचे वर्तन उलगडून दाखवले. वाचकांनी अनेक प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, विज्ञान लेखक होण्यासाठी प्रथम लेखक असणे गरजेचे आहे.

मेंदूचे कार्य कसे चालते, यावर सांगताना ते म्हणाले, मेंदू (त्याच्या दृष्टीने) अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मेंदू जरूर पडली तर चीटिंग करून, मखलाशी करून अर्थ लावतो. मेंदू रिकाम्या जागा स्वत:च भरून काढतो. मेंदू स्वत:चे नियम बनवतो. हे नियम पूर्वानुभवांवर अवलंबून असतात. तुमच्या संस्कारांवरही अवलंबून असतात. मराठी ग्रंथसंग्रहालयाने लेखक व वाचक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी दरमहिन्याला कार्यक्र म सुरू केला आहे, असे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. याप्रसंगी ठाण्यातील डॉ. विकास हजरनीसदेखील उपस्थित होते.

Web Title: Javadekar sheds light on the behavior of the human brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे