जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:51 AM2018-08-15T02:51:58+5:302018-08-15T02:52:30+5:30

सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही.

Jawan's mother Sangeeta Narote's solo battle | जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज

जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज

googlenewsNext

भिवंडी : सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही. राज्य सरकार, लोकायुक्त यांचे दरवाजे ठोठावूनही दाद मिळत नसल्याने संगीता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे.
देशाच्या सीमेचे तळहातावर शिर घेऊन रक्षण करणाऱ्या सागर पाटील या भिवंडीतील जवानाची आई संगीता नरोटे यांनी महापालिकेच्या २०१२ मधील मागासवर्गीय अनुशेष भरण्याकरिता ७४ पदांसाठी सरळसेवा भरतीमध्ये बालवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता. मात्र, या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नरोटे यांना पात्र असूनही अधिकाºयांनी डावलले. त्यामुळे नरोटे यांनी सर्व पुराव्यांनिशी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली व भरतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला. उपलोकायुक्तांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीकरिता केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांची नियुक्ती केली. त्यांनी भरतीमध्ये अधिकाºयांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल लोकायुक्तांना सादर केला. त्या अहवालाची दखल घेऊन उपलोकायुक्तांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश शासनाला दिले.
त्यानुसार, शासनाचे अवर सचिव अजित कवडे यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित केली. त्यांची विभागीय चौकशी करावी तसेच तीन महिन्यांत कारवाई करून तसा अहवाल शासनास सादर करावा, असे लेखी आदेश आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे लोकायुक्त कार्यालयाने मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमधील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून भरती रद्द करण्याचे आदेश दिले. दोन्ही कार्यालयांकडून आदेश मिळाल्यानंतर तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी उपायुक्त विनोद शिंगटे यांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. मात्र, पालिकेतील कनिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाबाबत गोपनीयतेचा भंग केल्याने कर्मचाºयांनी कोर्टात धाव घेतली. भरती रद्द न झाल्याने हे कर्मचारी नियमित पगार घेत आहेत. गेल्या सात वर्षांपासून नरोटे यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू आहे. खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवणाºयांवर फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

कारवाई शून्य
नरोटे यांनी अलीकडेच राज्य शासनाला पत्र लिहून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर ११ सप्टेंबर १७ रोजी शासनाचे अवर सचिव अजित कवडे यांनी मनपा आयुक्तांना नियमानुसार कारवाई करण्याच्या लेखी सूचना दिल्या. परंतु, १० महिने उलटून गेले, तरी पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

Web Title: Jawan's mother Sangeeta Narote's solo battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.