जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

By admin | Published: June 2, 2017 04:55 AM2017-06-02T04:55:03+5:302017-06-02T04:55:03+5:30

गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच

Jawhar, Vikramgad got wet with rain | जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

Next

हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास बरसल्याने जव्हार शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. दुपार पर्यत उन्हाचा कडका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते,
मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला व ठिकठिकाणी पत्र्यांच्या, कौलांच्या, कुडामातीच्या घरांवर प्लॅस्टीक टाकण्याची गडबड सुरू झाली. दरम्यान बालचमूंनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
बघता बघता नाले, गटारे, रस्ते वाहू लागले, अचानक पडलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वार व पादचाऱ्यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. थोड्याच वेळात शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला.
मात्र नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच वीज गुल झाली. त्यामुळेही हाल झाले. पावसाची संततधार तासाभर सुरू होती.
पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या परिसरात अनेक धबधबे आहेत. तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवी सारखे मोठे मोठे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.

विक्र मगडमध्ये ; वादळी वारे-विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

विक्र मगड : केरळ मधे मान्सूनचे आगमन झाल्याच्या पाठोपाठ गुरूवारी विक्र मगड मध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दणका दिल्याने बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस ७ जून नंतर येणार या समजात असलेल्या अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी, कौले चाळणे, डांबर भरणे, प्लॅस्टिक अंथरणे अशी कामे केलेली नव्हती. त्यांची आज एकच धांदल उडाली. मात्र या पावसाचा आगमनाने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे.

गेली दोन वर्षे अनियमित बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते. परंतु या वर्षी मान्सूनने वेळेत बरसण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे चार महीने देखील अशीच परिस्थिती राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसाईक, गवतपावली व्यावसायिक याचा माल भिजला. ही बाब त्यांचासाठी चिंतेची ठरली आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबलेल्या आंबा हंगामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसामुळे हवेत गरवा निर्माण झाल्याने उन व उकाड्याने त्रासलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसाचे आगमन होताच महावितरणचा भोंगळ कारभार सुरु झाला असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले
आहे.

Web Title: Jawhar, Vikramgad got wet with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.