नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:13 PM2018-10-12T15:13:08+5:302018-10-12T15:18:19+5:30
कल्याणचे रिक्षा चालक जयशंकर तपासे हे नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगाकडून रिक्षा भाडे आकारत नाहीत.
कल्याण - नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. ‘सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड’ या उक्तीला साजेशी देवीची भक्ती करणारे कल्याणचे रिक्षा चालक जयशंकर तपासे हे नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगाकडून रिक्षा भाडे आकारत नाहीत. त्यांना देवीच्या दर्शनासाठी रिक्षातून मोफत मंदिरारपर्यंत नेतात.
तपासे हे मूळचे कल्याणचे आहेत. त्यांच्या पत्नी कल्पना या गृहिणी आहेत. त्या अपंग असल्याने अपंगाना काय त्रस होतो याची पूर्व कल्पना व जाणीव त्यांना आहे. तपासे यांना तीन मुलं आहे. अजय नावाचा मुलगा मुंबईत कामाला आहे. तर जयेश नावाचा मुलगा फोटोग्राफर आहे. मुलगी विजयलक्ष्मी ही सातारा येथे सैनिकी प्रशिक्षणासाठी वास्तव्याला आहे. तपासे हे रिक्षा चालवून गवंडी कामही करतात. मुलांचे शिक्षण व घराचा खर्च रिक्षाच्या कमाईतून भागत नाहीत. त्यामुळे ते गवंठी गाव करतात. त्यातून मिळणारे पैसे व रिक्षाची कमाई यातून त्यांचे कुटुंब चालते.
तपासे हे महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि कल्याणच्या दुर्गाडी देवीचे भक्त आहे. त्यांच्या घरी घटस्थापना केली जाते. गवंठी काम व रिक्षा चालविण्यामुळे त्यांना पूर्ण वेळ देवीची पूजा अर्चा करता येत नाही. तपासे हे गेल्या तीन वर्षापासून नवरात्रीला वृद्ध व दिव्यांग प्रवाशांकडून भाडे घेत नाही. अनेक वृद्धांना देवीच्या दर्शनासाठी जायचे असते. त्यांना शक्य होत नाही. त्यांना दर्शनासाठी देवीच्या मंदिरापर्यंत सोडतात. या सेवेत त्यांना देवीच्या भक्तीचा आनंद मिळतो. त्यामुळे ते ही सेवा करतात.