कोपर उड्डाणपुलावरून जेसीबी कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:15 PM2020-05-11T13:15:03+5:302020-05-11T13:16:08+5:30
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही परिसरातील रहिवाश्यांमध्ये घबराहटीचे वातवरण पसरले आहे.
डोंबिवली: महिनाभरपसून कोपर उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्या पुलाच्या बायपासवरील स्लॅब तोडण्याचे काम सुरू होते, त्या दरम्यान सोमवारी दुपारी 12.15 दरम्यान जेसीबी स्लॅबसकट राजाजी पथ रस्त्यावर खाली कोसळला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही परिसरातील रहिवाश्यांमध्ये घबराहटीचे वातवरण पसरले आहे. जेसीबी पडल्यानंतर मोठा आवाज झाला, परिसरता धुरळा पसरला होता. त्यामुळे वातवरणात तणाव झाला होता. या कामामुळे राजाजी पथ मार्ग आधीच बंद पडला होता, त्यामुळे वाहन ये जा करत नव्हती, परंतु काही प्रमाणात नागरिकाची वर्दळ सुरूच होती, पण सुदैवाने काहीही वाईट घडले नाही.
या कामादरम्यान अपघात झाल्यावर संबंधित कंत्राटदाराचे कर्मचारी उपस्थित होते. पण अर्धा तास झाला तरीही महापालिका, रेल्वेचे कोणतेही अधिकारी अपघात स्थळी आले नव्हते. स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली.