कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:59 AM2020-08-18T00:59:52+5:302020-08-18T01:00:02+5:30

गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत.

Jemtem passengers in the Konkan ST, displeased with the people of Konkan | कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

Next

स्नेहा पावसकर 
ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने १२ आॅगस्टपर्यंत आणि त्यानंतरही एसटीची सोय केली आहे. यात ठाण्यातून १२ आॅगस्टपर्यंत कोकणात गेलेल्या प्रत्येक बस या भरून गेली. मात्र, १३ तारखेपासून जाणाºया एसटीला ठाणेकर कोकणवासीयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे नियम पाळून जाणाºया एसटीमध्ये २२ सीट बुक होतात. परंतु, गेल्या चार दिवसांत ठाण्यातून कोकणात गेलेल्या एसटी या जेमतेम ५० टक्के भरल्या होत्या. मूळात आता एसटीने जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट सक्तीची असल्याने चाकरमान्यांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.
गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत. ५ ते १२ आॅगस्टदरम्यान कोकणात जाणाºयांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची नव्हती. तर एसटीने जाणाºयांना ई-पासचीही गरज नव्हती. याच पार्श्वभूमीवर राज्य महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे,कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भार्इंदर या पाच डेपोतून ५ ते १२ आॅगस्टदरम्यान ३९७ जादा बस सोडण्यचा निर्णय घेतला होता. त्याला ठाणेकर कोकणवासीयांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. ३९७ पैकी अर्ध्याहून जास्त म्हणजे २१६ बस कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसाठी सोडल्या गेल्या. बसची संख्या कमी करावी लागली असली तरी त्या पूर्ण २२ प्रवाशांनी भरून गेल्या. मात्र, १३ तारखेपासून कोकणात जाणाºया प्रवाशांना कोरोना स्वॅब टेस्ट अनिवार्य केली आहे. ती निगेटिव्ह आली तरच प्रवास करता येणार आहे. त्याचा परिणाम एसटीच्या बुकिंगवर झालेला दिसला. कोरोना टेस्ट करून एसटीने कोकणात जाण्याची ठाणेकरांची मानसिकता दिसत नाही. त्यातच ती करून गेले तरी अनेक ग्रामपंचायतीने गावात प्रवेशासाठीचे नियम वेगवेगळे केले आहे. परिणामी १३ आॅगस्टपासून ठाण्यातून जाणाºया एसटीमध्ये जेमतेम १२-१३ प्रवासी होते. जेमतेम अर्धे प्रवासी असल्याने आम्ही गाडी सोडली. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी असतील तर मात्र आम्हाला तेवढ्याच
प्रवाशांसाठी एसटी सोडायची की नाही
विचार करावा लागेल, असे
एसटीच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
>गणपतीला कोकणात जायची ओढ आहे, पण कोरोना टेस्टचा खर्च, त्रास नकोसा वाटतो. एवढं करूनही टेस्ट निगेटिव्ह आली तरी पुन्हा गावात तीन दिवस क्वारंटाइन सक्तीचे केले आहे, त्यामुळे अर्धा गणेशोत्सव क्वारंटाइनमध्येच संपेल. त्यामुळे यंदा बाप्पाला इथूनच हात जोडायचे.
- ज्ञानेश परब, ठाणे
>कोकणात गणेशोत्सवाची मजा असते. दरवर्षी कुटुंबासह जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे इतके वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे जायची इच्छा नाही. प्रवासात आणि गावी पोहोचल्यावरही नियम. एसटीमध्ये सोशल डिस्टन्स चांगले आहे. मात्र, कोरोना टेस्ट आवश्यक आहे. ती निगेटिव्ह आली तर प्रवास, पण पॉझिटिव्ह आली तर प्रवास करताच येणार नाही आणि पैसेही मिळणार नाही, त्यामुळे डबल नुकसानही होणार आहे.
- दर्शन सरमळकर, ठाणे

Web Title: Jemtem passengers in the Konkan ST, displeased with the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.