दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: April 7, 2024 06:52 PM2024-04-07T18:52:24+5:302024-04-07T18:52:33+5:30
कळवा पोलिसांची कारवाई: चांदीचे दागिने हस्तगत
ठाणे: सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या रेखा छोटू शिंदे (३८, रा. दिघा, नवी मुंबई) आणि सुगंधा सूर्यभान मकाळे (३५, रा.दिघा, नवी मुंबई) या दोन महिलांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली. त्यांच्याकडून चांदीच्या पैजणाचा जोड हस्तगत केला आहे.
ठाण्यातील अर्जुनसिंह राठोड (१९, रा. विटावा, कळवा, ठाणे) यांच्या सोने चांदीचे दागिने विक्रीच्या राजलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानामध्ये ६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या. या महिलांनी राठोड यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करून काउंटरवर ठेवलेले चांदीचे पैजण चोरी करून पसार झाल्या होत्या. चोरीचा गुन्हा दाखल होताच, कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकातील अमलदार शहाजी एडके, रमेश पाटील, श्रीमंत राठोड, दादासाहेब दोरकर आणि राहुल पवार आदिंच्या पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. त्यानंतर यातील रेखा आणि सुगंधा या दोघींना
अवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या चोरीची कबूली दिली.
त्याच आधारे तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली.ग्रॅम वजनाचे पाच लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूकीने चोरल्याचाही एक गुन्हा नालासोपारा पोलिस ठाण्यात ठाण्यात दाखल झाहे. या महिलांना आता ष्घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर सांगवे हे अधिक तपास करीत आहेत.