'झुठ बोले कौआ काटें'; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:36 PM2018-12-20T14:36:37+5:302018-12-20T14:39:22+5:30

डोंबिवली-तळोजा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना शहर शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

'Jhooth Bole Kauwa Kaate'; Shiv Sena's comment on Prime Minister Narendra Modi | 'झुठ बोले कौआ काटें'; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

'झुठ बोले कौआ काटें'; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

googlenewsNext

डोंबिवली: कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. त्यातच डोंबिवली-तळोजा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना शहर शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मार्गाला जोडणाऱ्या तळोजा-डोंबिवली मेट्रोच्या मार्गाची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. 2022-23 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो मार्ग उपलब्ध होतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला. मात्र, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत बॅनरबाजी करत कल्याण मेट्रोच्या कामाचा लेखाजोखा माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणासह बॅनरवर मांडला. भाजपा मेट्रोचे श्रेय घेत आहे, पण ये पब्लिक है सब जानती है, असा टोलाही लगावला.

दरम्यान, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि नगरसेवक यांनीही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात भाजपा आणि शिवसेनेकडून मेट्रोच्या श्रेयवादासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. तर त्याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमिपूजन केले होते. त्यावर भाजपाने बहिष्कार घातला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.
 

Web Title: 'Jhooth Bole Kauwa Kaate'; Shiv Sena's comment on Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.