ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या "जिगरी" एकांकिकेने जिंकली रसिकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:12 PM2018-07-16T16:12:54+5:302018-07-16T16:15:28+5:30

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जिगरी एकांकिका सादर झाली. या एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. 

"Jigari" Ekeniika, who performed on Thane acting shoots, won the hearts of the audience | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या "जिगरी" एकांकिकेने जिंकली रसिकांची मने

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या "जिगरी" एकांकिकेने जिंकली रसिकांची मने

Next
ठळक मुद्दे"जिगरी" एकांकिकेने जिंकली रसिकांची मनेकचरा वेचणाऱ्या माणसांच्या आयुष्यावर भाष्य करणारी एकांकिका वऱ्हाड निघालय लंडनला या एकपत्रीचा प्रयोग सादर

ठाणे : ह्रिशिकेश कोळी लिखित आणि अभिषेक सावळकर दिग्दर्शित *"जिगरी"* हि एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर झाली.या एकांकिकेतील "तारा" आणि "मसिहा"या पात्रांची भूमिका आवडल्याने प्रेक्षकांनी कलाकारांसाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. यंदाचा हा ३८५ क्रमांकाचा कट्टा होता.

      कचरा वेचणाऱ्या माणसांच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही एकांकिका उत्साहात सादर झाली.नजर मेलेली आणि भावनाशून्य आयुष्य जगणारी माणसं  या नाटकात रसिकांना जवळून पाहायला मिळाली.गावाबाहेर किंवा शहरा बाहेर कचऱ्याचे मोठ मोठे ढीग दिसतात.अपल्यासाठी तो कचरा टाकावू असतो पण त्याच कचऱ्यातून जगणं वेचून काही मंडळी आपला उदरनिर्वाह करतात.असं फाटकं आयुष्य जगताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.   झपाटयाने होणारे शहरीकरण,वाढती महागाई,फॅशन,स्टेटस,डिग्निटी यांचा त्यांच्या आयुष्याशी दूर दूर संबंध येत नाही.त्यांच्या आयुष्यात भूक ही एकच शाश्वत आणि खरी गोष्ट आहे.अन्न,वस्त्र,निवारा या एकाच गोष्टी साठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो असे या नाटकातून सांगण्यात आले.या एकांकिकेत अभिषेक सावळकर,शुभांगी गजरे,सहदेव साळकर,ओमकार मराठे,प्रथमेश यादव,प्रथमेश मंडलिक,चिन्मय मोर्य या कलाकारांनी काम केले.नेपथ्य सहदेव साळकर आणि प्रकाशयोजना परेश दळवी याने केली होती.संगीत कुंदन भोसले याने केले होते. आपल्या अभिनय कट्ट्यावर अनेक भाषांमधून नाटकं सादर केली जात आहेत ही खरंच अभिमनाची गोष्ट आहे. कलेला भाषेचे बंधन नसते असे आयोजक किरण नाकती म्हणाले. यावेळी कट्ट्याचे निवेदन कदीर शेख याने केले.दीपप्रज्वलन रुक्मिमी कदम यांनी केले.रुक्मिणी कदम यांनी वऱ्हाड निघालय लंडनला या एकपत्रीचा प्रयोग सादर केला.

Web Title: "Jigari" Ekeniika, who performed on Thane acting shoots, won the hearts of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.