डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 09:01 AM2018-01-12T09:01:28+5:302018-01-12T15:46:59+5:30
जिजाऊ माता यांचा जन्मोत्सव डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डोंबिवली- ''वर्णावा काय महिमा तुझया मायेचा
आसरा मज तुझिया शीतल छायेचा ll
पुण्य कर्म सारे वासाठी तुझिया ठायी ll
नांदे शिवशाहीचा संसार तुझया पायी.. ll''
12 जानेवारी सर्व नागरिकांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची जयंती. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीत मराठवाडा विदर्भ रहिवाशी सेवा संस्थेतर्फे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे संस्थापक दत्ता माळेकर यांनी त्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने माता जिजाऊंची आठवण, शिकवण जनमानसात कायम रहावी, युवकांना त्यांचे योगदान माहीत व्हावे यासाठी हा सोहळा करत असल्याचे माळेकर यांनी लोकमतला सांगितले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचा पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात सोहळा संपन्न होणार असून त्यास
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकर सर्वपक्षीय नगरसेवक आवर्जून येणार असल्याचे माळेकर म्हणाले. याच निमित्ताने राजमाता जिजाऊ पुरस्कारदेखील समाजातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे.