वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:48 PM2023-11-20T18:48:45+5:302023-11-20T18:49:11+5:30

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान.

Jijau's sisterhood is complete with her female sisters in the transport department in thane | वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न

वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न

विशाल हळदे,ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान करत आहेत.. शहराच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा ठाणे शहर वाहतूक विभागातील महिला भगिनींचा कृतज्ञतेचा भाऊबीज सोहळा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील तीनात नाका येथे स्थित असणाऱ्या वाहतूक विभागातील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागातील शंभरहून अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या दरम्यान या सर्वांसोबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने भाऊबीज साजरी करत सर्व महिला भगिनींना पैठणी साडी भेट देत अनेक भेटवस्तू दिल्या  आहेत.. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांना पुढे जाण्याकरिता प्रोत्साहित करत असते व नेहमीच महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी असते असे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे म्हणाले आहेत इतकच नव्हे तर शहरात फिरत असताना अनेकदा मला जिजाऊ चे कार्यक्रम व काही समाज उपयोगी उपक्रमांचे बॅनर झळताना दिसून आले आहेत परंतु आज प्रथमच हा योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिजाऊ सोबत भेटण्याचा आला असे यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड म्हणाले... या प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त कवियित्री गावित आदी, ACP  ममता डिसूजा  माजी जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे, युवा उद्योजक धीरज सांबरेसह अनेक महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Jijau's sisterhood is complete with her female sisters in the transport department in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.