जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:15 AM2017-12-26T03:15:53+5:302017-12-26T03:16:02+5:30

ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता.

Jingle is the way ..., church decorations, mall-campus gulpajale | जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले

जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले

Next

ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता. चर्चबरोबर, दुकाने आणि मॉलही सजले होते. हे सेलिब्रेशन अजून दहा दिवस अशाच उत्साहात सुरू राहणार आहे. नाताळच्या शुभेच्छा, नाताळ गोठ्यांची सजावट, केक-चॉकलेटची लयलूट, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तू, गिटारच्या साथीने रात्रभर सुरू असलेले खाणे-पिणे आणि गाणेबजावणे अशा वातावरणात नाताळचा उत्साह द्विगुणित होत गेला.
जेथे जेथे सांताक्लॉज उपस्थित आहे, तेथे त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून चॉकलेट घेण्यासाठी चिमुकल्यांची गर्र्दी झाली होती. ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’सारखी गाणीही ऐकायला मिळत होती. खास नाताळनिमित्त बसवलेली गाणी, प्रार्थना, बायबलमधील उताºयांचे वाचन, नाताळचे संदेश यामुळे वातावरणाला वेगळेच धार्मिकतेचे वलय लाभले होते.
नाताळचे वेध लागले की ख्रिस्ती कुटुंबात घरी सजावट, फराळाची जोरदार तयारी सुरू होते. दोन-तीन दिवस आधीच घराघरांत आणि चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा तयार केला जातो. तसा गोठा सजविला जातो. घरातील मंडळी वेळ काढून या कामात हातभार लावतात. नाताळची पूवर्संध्याही उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. त्यातच यंदा तो दिवस रविवारचा असल्याने चर्चमध्ये गर्दी वाढली होती. प्रत्यक्ष नाताळच्या दिवशी सोमवारी सकाळी चर्चमध्ये येशूजन्माचा आनंद साजरा केला गेला. नाताळच्या शुभेच्छा दिल्या. काही चर्चतर्फे गरजूंना मदत केली गेली, असे ख्रिस्ती बांधव विश्वास उद्गीरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नाताळच्या काळात हजारो भाविक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येतात. काही चर्चमध्ये मराठी व इंग्रजीत भक्तीमार्ग सांगितला जातो. अनेक चर्चेमध्ये ११ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत ख्रिसमस कॅरल्स झाल्या. त्यात घरोघरी जाऊन येशू जन्माची सुवार्ता सांगितली गेली. ज्यांच्या घरी कॅरल्स सिंगिंग झाले नाही त्यांच्यासाठी नाताळच्या पहिल्या दिवशी सायंकाळी चर्चबाहेर वाद्यवृंदासह ती गाणी सादर झाली. ही परंपरा जपण्यासाठी दरवर्षी चर्चची तरुण मंडळी घरोघरी जातात.
>डोंबिवलीतही नाताळजल्लोष
मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, भेटवस्तुंचे वाटप करत डोंबिवली-कल्याण परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरा झाला. चर्च सजवण्यात आली.
कल्याणला कर्णिक रोडवरील सेंट थॉमस चर्चमध्येही येशू्च्या गोठ्याचा देखावा साकारला आहे. रात्रीपासून नेबर पार्टीला सुरुवात होणार आहे. या पार्ट्या १ जानेवारीपर्यंत चालतात. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगरच्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधव जमले. कॅरल सिंगिग झाले. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, तामिळ भाषेत देवाची गाणी सादर केली गेली.
पाच हजार ख्रिस्तींनी एकत्र येत चर्चमध्ये प्रार्थना केली, अशी माहिती फादर व्हिक्टरी डालमेंट यांनी दिली. ख्रिसमसनिमित्त मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांसाठी ज्येष्ठांना घेऊन येण्याची जबाबदारी त्या विभागातील प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.
>पुस्तकांचा ख्रिसमस ट्री
ख्रिसमसनिमित्त वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीने टिळकनगर शाळेसमोर विविध पुस्तकांचा ख्रिसमस ट्री तयार क ेला आहे. तरूणांमध्ये आणि मुलांमध्ये वाचनांची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा ट्री उभारण्यात आला आहे.
>कलकल आणि केक
ख्रिस्तीबहुल वस्तीत आकर्षक सजावटी होत्या. आकाशकंदिल, रंगीबेरंगी स्टार्सने परिसर सजला. खमंग फराळही तयार केला गेला. विविध केक, नानकटाईबरोबर मिल्क क्रिम, जुजुब्स, ग्वा चीज, कलकल्स, कोकोनट कॉरडियल, करंजी, रिच प्लम केक व ख्रिसमस कप केक तयार झाले. काहींनी ख्रिसमस ट्रीच्या आकाराचे स्वीट तयार केले.

Web Title: Jingle is the way ..., church decorations, mall-campus gulpajale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे