जितेंद्र आव्हाड यांना सहाय्यक आयुक्त महेश आहेर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

By अजित मांडके | Published: March 3, 2023 08:23 PM2023-03-03T20:23:19+5:302023-03-03T20:23:31+5:30

महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केल्याचा आरोप आहे.

Jitendra Awad granted pre-arrest bail in Municipal Assistant Commissioner Mahesh Aher case | जितेंद्र आव्हाड यांना सहाय्यक आयुक्त महेश आहेर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

जितेंद्र आव्हाड यांना सहाय्यक आयुक्त महेश आहेर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

googlenewsNext

ठाणे : महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून आपल्या जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आव्हाडांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. शुक्रवार त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 

आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले, अशी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट क्रमांक ४ च्या बाहेर बेदम मारहाण केली.

याप्रकरणी आमदार आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांचा प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे. त्यांच्यानंतर आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.  त्या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने तो निकाल ३ मार्च राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने आव्हाडांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

Web Title: Jitendra Awad granted pre-arrest bail in Municipal Assistant Commissioner Mahesh Aher case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.