आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: March 5, 2024 03:22 PM2024-03-05T15:22:44+5:302024-03-05T15:22:58+5:30

आव्हाड यांना भीती वाटतेय की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाऊ नये, आनंद परांजपे यांची टीका

Jitendra Awha fears that people around him will go to Ajit Pawar - Anand Paranjpe | आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

ठाणे -  जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटतेय. की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाईल. यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत.आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, ३०७ ची केस, अशावेळी आव्हाड हे कुठल्या नैतीकतेचे उपदेश देतात ? आम्हीही यावर बोलायचे का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवार  हे आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे ४५ प्लस उमेदवार विजयी होतील ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असे सडेतोड फटकारे ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओढले.

कळवा विधानसभा मतदारसंघात पण मतदार त्यांना फार सिरियसली घेत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. यामुळे आव्हाड यांना अजित पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवालहि त्यांनी केला.  ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा आणि ज्या सनातन संस्थेबद्दल कायम  आव्हाड बोलत असतात त्या संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते आणि जिथे प्रभू श्रीरामाचे कथा होती तिथे त्यांनी तुतारी वादन केले ! रायगडावर त्यांनीखरीच तुतारी वाजवली की खोटी तुतारी वाजवली मला माहित नाही. पण ज्या कार्यक्रमात सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठ होते त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांनी तुतारी वाजवली. त्यांनी जर तिथे जाऊन बोलण्याची हिम्मत, धारिष्ट दाखवले असते की  प्रभू श्रीराम मांसाहारी होते ! मग यावर तिथून काय प्रतिक्रिया रामभक्तांकडून आली असती ? असा सवाल त्यांनी विचारला. 

कळव्याच्या मतदारसंघांमधून... ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहित पडले असते ! आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे ज्या निवडणुकीत महायुतीमध्ये लढू. जिथे तिथे लोकसभेला घड्याळ चिन्ह घेऊन आमचे उमेदवार असतील तिथे आम्ही घड्याळाचा प्रचार करू. जास्तीत जास्त मतांनी आमचे लोकसभेचे उमेदवार जिंकतील. भाजपचे केंद्रीय शिर्ष नेतृत्व, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व राष्ट्रवादी काँग्रेसकडून  राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित  पवार हे महायुतीचे नेते चर्चेला एकत्र बसतील तेव्हा महायुतीचा फॉर्मुला डिक्लेअर होईल. याबाबतचा योग्य ते निर्णय महायुतीचे नेते घेतील. खेळीमेळीच्या वातावरणात सीट वाटप होईल. महायुतीचे उमेदवार ४५ प्लस विजयी झालेले असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Jitendra Awha fears that people around him will go to Ajit Pawar - Anand Paranjpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.