राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

By अजित मांडके | Published: April 17, 2023 04:48 PM2023-04-17T16:48:14+5:302023-04-17T16:52:28+5:30

"स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते"

Jitendra Awhad alleges that the crowd was gathered only to gain political advantage | राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. वास्तविक पाहता भारतरत्न सारखा पुरुस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जोता. त्यामुळे महाराष्ट्र भुषण हा कार्यक्रम देखील अशाच पध्दतीने घेणे आवश्यक होत असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. मात्र भाविकांच्या आनंदाचा राजकीय फायदा उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आमि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवत हे अत्यंत चुकीचे धोरण यात दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले, असा आरोप आव्हाड यांनी केला. स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावल होते. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही, प्रचंड ऊन त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणाºया कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडल नसेल. त्या वादात मला पडायच नाही. पण, या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते? हा कार्यक्रम संध्याकाळी देखील घेता आला असता. भरदुपारी सुर्य माथ्यावर असताना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ?, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. संतांचा तसेच धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. नंतर मत आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे, यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मत वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे, हे या प्रकरणातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Jitendra Awhad alleges that the crowd was gathered only to gain political advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.