मोदी सरकार कोत्या मनोवृत्तीचे - आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:11 AM2020-01-25T06:11:00+5:302020-01-25T06:12:29+5:30
शरद पवार म्हणजे सह्याद्रीचा पहाड आहेत. त्यांची सुरक्षाव्यवस्था काढल्याने काहीही होणार नसून ते घाबरणाऱ्यांतले नसल्याचे वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केले.
ठाणे : शरद पवार म्हणजे सह्याद्रीचा पहाड आहेत. त्यांची सुरक्षाव्यवस्था काढल्याने काहीही होणार नसून ते घाबरणाऱ्यांतले नसल्याचे वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केले. लोकांचे प्रेम हेच पवार यांचे सुरक्षाकवच असल्याचे सांगून केंद्रातील मोदी सरकार कोत्या मनोवृत्तीचे असल्याची टीकाही केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षाव्यवस्था काढली आहे. याच मुद्यावरून आव्हाड आक्रमक झाले. आपण भाजपला कदापि घाबरणार नसल्याचे ते म्हणाले. पवार यांची सुरक्षाव्यवस्था काढली हे बरे झाले. कारण, महाराष्ट्राला कळले की, केंद्र सरकार किती कोत्या मनोवृत्तीचे आहे असे आव्हाड म्हणाले.
फोन टॅपिंग ही विकृती
फोन टॅपिंग ही एक विकृती आहे. भाजप सरकारने ही विकृती का केली, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच कोरेगाव भीमा हे षड्यंत्र असल्याचेही ते म्हणाले.