अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता; जितेंद्र आव्हाडांची टीका

By अजित मांडके | Published: November 7, 2022 06:23 PM2022-11-07T18:23:33+5:302022-11-07T18:25:36+5:30

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जाळला अब्दुल सत्तारांचा पुतळा

jitendra awhad criticised abdul sattar was a staunch advocate of manuvad | अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता; जितेंद्र आव्हाडांची टीका

अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता; जितेंद्र आव्हाडांची टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाण्यात सोमवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चप्पलांचा हार घालून तो जाळला. यावेळी आव्हाड यांनी, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लाममध्येही नाही, अशी टीका त्यांनी केली. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिविगाळ केली आहे. सत्तार यांच्या या शिविगाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाणे पक्ष कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार ठाण्यात आले तर त्यांचे तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

आव्हाड यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की,  अब्दुल सत्तार यांनी अत्यंत नीच भाषेमध्ये टीका केली आहे. अब्दुल सत्तार हे ज्या शिव्यांच्या शाळेत आहेत; त्या शाळेचे आम्ही सर्व मुख्याध्यापक आहोत. पण, सामाजिक जीवनात काम करीत असताना  शरद पवार यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे आम्ही कधीच कोणाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत नाहीत. त्यांनी आमच्यावर तसे संस्कार केले आहेत. आता त्याही पुढे जाऊन आम्ही सांगतो की, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लामही नाही. 

वरिष्ठांना खुष करण्यासाठी सत्तार यांनी हे विधान केले आहे का, असे विचारले असता, “ त्यांच्या वरिष्ठांनी आता ठरवावे की सत्तार यांचे काय करावे ते! आम्हाला त्यांच्या वरिष्ठांशी काही देणेघेणे नाही असे सांगितले. वृत्त उघडकीस आणणार्‍या पत्रकारास धमक्या अब्दुल सत्त्तार यांनी केलेले हे वक्तव्य उघडकीस आणणार्‍या पत्रकारास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोटही  आव्हाड यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: jitendra awhad criticised abdul sattar was a staunch advocate of manuvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.