जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:34 PM2022-11-07T22:34:59+5:302022-11-07T22:43:44+5:30

काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे

Jitendra Awhad shut down the show of Har Har Mahadev movie in thane, the audience demanded money | जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण

जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण

Next

अजित मांडके

ठाणे - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे, त्याला विरोध करत आज रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संत तू झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
   
काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध सुरू झालेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दहा वाजता विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकांने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सन्ताप झालेल्या या दर्शकांनी त्यांचं ऐकलं नाही अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवल्या जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाजीप्रभू देशपांडे हा छत्रपती शिवाजी महाराजांची लढताना दाखवलेला आहे हा चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Jitendra Awhad shut down the show of Har Har Mahadev movie in thane, the audience demanded money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.