ठाण्यात जोडे मारो आंदोलन; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक!

By अजित मांडके | Published: November 17, 2022 01:23 PM2022-11-17T13:23:51+5:302022-11-17T13:24:06+5:30

आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

Jode Maro Andolan in Thane; Shinde group aggressive on Rahul Gandhi's statement about Savarkar! | ठाण्यात जोडे मारो आंदोलन; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक!

ठाण्यात जोडे मारो आंदोलन; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक!

googlenewsNext

ठाणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात ठाण्यात शिंदे गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधीच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वतक्त्यावाचा निषेध करण्यात आला. टेभी नाका परिसरात केलेल्या आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठाण्यातही राहुल गांधी यांच्या विधानाचे पडसाद उमटले असून ठाण्याच्या टेभी नाका परिसरात राहुल गांधीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध करण्यात आला. 

स्वतः बाळासाहेब ठाकरे हे सावरकर यांच्या विचारांना मानणारे होते. त्यांच्या विरोधात कोणी वादग्रस्त विधान केले तर स्वतः बाळासाहेब मैदानात उतरले होते. मात्र त्यांचे युवराज आज राहुल गांधी यांची गळाभेट घेत असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी केली आहे. सावरकरांच्या संदर्भात अशी वादग्रस्त विधान खपवून घेणार नसल्याचा इशारा म्हस्के यांनी यावेळी दिला.

Web Title: Jode Maro Andolan in Thane; Shinde group aggressive on Rahul Gandhi's statement about Savarkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे